18.4 C
New York

Sambhaji Bhide : सर्वधर्म समभाव म्हणजे ढोंगीपणा; संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

Published:

स्वातंत्र्यावेळी तिरंगा झेंडा आपण स्वीकारला. तिरंगा आणि संविधान आपण मानलेच पाहिजे. पण भगवा ध्वज हा हजारो वर्षांपासून देशाचं प्रतिक आहे. त्यामुळे देव, देश आणि धर्मासाठी कटिबद्ध राहा. 15 ऑगस्टला तिरंगा फडकवूच . पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करत राहू, असे भिडे म्हणाले. नाशिक दौर्‍यावर असताना संभाजी भिडे यांनी हे वक्तव्य केले. सर्वधर्मसमभाव म्हणजे भारत मातेच्या पोरांनी भारत मातेच्या भवितव्याशी केलेली प्रतारणाच असते, असे सांगत सर्वधर्मसमभाव मानणे म्हणजे केवळ ढोंगीपणा असल्याचे वादग्रस्त वक्तव्य संभाजी (Sambhaji Bhide)  भिडे यांनी केले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने सोमवारी आयोजित व्याख्यानात ‘भारतीय स्वातंत्र्य आणि आपण व हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन’ या विषयावर संभाजी भिडे बोलत होते. आंबा खालल्याने मुले होतात या वाक्याचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चर केला.

Sambhaji Bhide  ‘आंब्या’च्या त्या वक्तव्यावर भिडे ठाम

आंबा खाऊन मुलं होतात, संभाजी भिडे या वक्तव्यावर हे ठाम आहेत. त्यांनी नाशिक येथील कार्यक्रमात या वक्तव्याचा पुनरूच्चार केला. मी आंबे खाऊन मुलं होतात, असं बोललो होतो. मी एक आंब्याचं झाड लावलं आहे. तिथे आजही तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता. माझ्यावर त्या वक्तव्यावरून खटला सुरू आहे, हे सांगायला गुरुजी विसरले नाहीत. त्याचवेळी त्यांनी या वक्तव्याला प्रसिद्धी देणाऱ्या आणि सवाल करणाऱ्या माध्यमांवर आगपाखड सुद्धा केली.

Sambhaji Bhide  तर मिळेल मंत्राची शक्ती

खग्रास ग्रहाच्या काळात एकदा मनुष्य एखाद्या मंत्राचा जप करेल त्याला त्या मंत्राची शक्ती मिळते. जन्मोजन्मी शक्ती मिळते, असे भिडे गुरूजी म्हणाले. गायत्री मंत्राचा जप शिवाजी महाराज यांनी केला होता, अंगावरचे कपडे काढून मानेपर्यंत शीत (थंड)पाण्यात काही तास होते. तीन एप्रिल रोजी त्यांना ताप असाह्य झाला. तोंडांवाटे पाणी दिलेले शरीरातून बाहेर पडत होते. शरीर पूर्ण खचले होते. हे उपस्थित असलेल्या व्यक्तींना शिवाजी महाराज म्हणाले की आम्ही जातो आमचा काळ झाला. सप्तसिंधू सप्त गंगा मुक्त करा हे त्यांचे शेवटचे शब्द: होते. त्या भडव्या औरंग्याला गाडा, काशी विश्वेश्वर मुक्त करा, असे ते म्हणाले होते, असे संभाजी भिडे म्हणाले.

Sambhaji Bhide  गणोजी शिर्केंविषयी आगपाखड

सोयराबाई यांना जे वाटतं होत ते शक्य नव्हतं, सोयराबाई यांना छत्रपती संभाजी महाराज राजा व्हावं असं वाटत नव्हते. राजाराम महाराज हे संभाजी महाराज यांच्या नंतर राजे झालेच. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यात साम्य काय तर, संभाजी महाराज हे शिवाजी महाराज यांच्या तोडीस तोड व्यक्तीमहत्व होते. संभाजी महाराज यांच्या पत्नीचा भाऊ गणोजी शिर्के हा नालायक माणूस ज्यानं वतनासाठी शेण खाल्लं, असे वक्तव्य भिडे यांनी केले.

Sambhaji Bhide  हिरोजी फर्जंद विसरू नका

15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस साजरा करू. तिरंगा फडकू. पण लवकर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार यासाठी काम करा हे आपले काम आह. सगळ्यांमध्ये सामील होऊ, तिरंगा फडकू. पण डोक्यात हिरोजी फर्जंद यांनी सांगितले ते काम करू, असे सांगायला भिडे गुरूजी विसरले नाहीत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img