पांढऱ्या केसांमुळे त्रासलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेकदा आपण केसांवर मेहंदी लावतो, पण त्यामुळे केस केशरी किंवा लालसर होतात. यावर उपाय म्हणून योग आणि निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. प्रियंका त्रिवेदी यांनी केस काळे करणारी खास मेहंदी रेसिपी सांगितली आहे.
त्यांच्या मते, या रेसिपीमध्ये बीटचा रस गरम करून त्यात हवे तेवढे मेहंदी पूड, एक चमचा कॉफी, एक चमचा मेथी पावडर आणि जास्वंदाच्या फुलाची पूड मिसळावी. हे मिश्रण थोडं गरम करून थंड झाल्यावर केसांवर लावावं. या पद्धतीने लावलेली मेहंदी केसांना नैसर्गिक काळा रंग देते आणि नुकसानही करत नाही. याशिवाय आवळा, शिकाकाई, कांद्याचा रस, तसेच कढीपत्ता आणि नारळाचं तेल यांचा वापर करून केस काळे, दाट आणि मजबूत होऊ शकतात.
मेहंदीचे फायदे:
नैसर्गिक रंग देतो
केस मुलायम आणि चमकदार बनतात
केस गळती कमी होते
कोंडा कमी होतो
टाळू निरोगी राहतो
केसांची वाढ सुधारते
या सोप्या उपायांनी तुम्ही रसायनांपासून दूर राहून केसांना नैसर्गिकरित्या काळं, दाट आणि निरोगी ठेवू शकता.