18.4 C
New York

Dhanush Anger Over Ai Climax : AIने बदलला ‘रांझना’चा शेवट, धनुष आणि दिग्दर्शक आनंद एल. राय आक्रमक

Published:

2013 मध्ये प्रदर्शित झालेला ‘रांझना'(Raanjhanaa)हा चित्रपट आजही अनेकांच्या आठवणीत जिवंत आहे. एकतर्फी प्रेमावर आधारित ही भावनिक कथा आणि त्याचा त्रागा करणारा शेवट प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून गेला होता. या चित्रपटाचा तमिळ व्हर्जन ‘Ambikapathy’ नावाने पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे, मात्र यावेळी त्याचा शेवट पूर्णपणे बदललेला आहे आणि तोही एआयच्या मदतीने.

AI म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स वापरून मूळ चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये छेडछाड करण्यात आली असून, मूळ कथेत जिथे कुंदन (धनुष) (Dhanush)चा मृत्यू होतो, तिथे आता तो जिवंत होतो. नव्या व्हर्जनमध्ये कुंदन डोळे उघडतो आणि त्याचे मित्र आनंदाने त्याच्याभोवती गोळा होतात असा अनपेक्षित ट्विस्ट सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

या बदलामुळे चित्रपटाचे मुख्य अभिनेता धनुष अत्यंत अस्वस्थ झाला असून, त्याने आपल्या एक्स (पूर्वीचा ट्विटर) अकाउंटवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धनुषने म्हटलं, “AI च्या मदतीने ‘रांझना’चा शेवट बदलणं हे मूळ कथेला आणि त्याच्या आत्म्याला मारक आहे. १२ वर्षांपूर्वी मी ज्या चित्रपटासाठी होकार दिला होता, तो हा नव्हे. अशा बदलांमुळे चित्रपटाच्या सर्जनशीलतेला धोका निर्माण होतो.”

दिग्दर्शक आनंद एल. राय (Aand L Ray) यांनीही आपल्या भावना सोशल मीडियावर मांडत या निर्णयाला विरोध केला आहे. दोघांनीही असं स्पष्ट केलं आहे की, कलाकारांची आणि दिग्दर्शकांची परवानगी न घेता एआयच्या सहाय्याने कथानकात बदल करणं हे कलाक्षेत्रासाठी गंभीर इशारा आहे.

हा बदल 1 ऑगस्टपासून थिएटरमध्ये दाखवल्या गेलेल्या तमिळ व्हर्जनमध्ये पाहायला मिळतो. अनेक प्रेक्षकांना या नव्या शेवटाचा धक्का बसला आहे, तर काही जण या क्लायमॅक्सवर वादग्रस्त चर्चाही करत आहेत.

‘रांझना’सारख्या संवेदनशील चित्रपटाच्या शेवटी एआयने हस्तक्षेप करून केलेला बदल केवळ कलाकारांनाच नव्हे, तर संपूर्ण सिनेप्रेमींच्या भावनांना धक्का देणारा आहे. कलात्मकतेच्या स्वातंत्र्यावरील या हस्तक्षेपावर आता संपूर्ण चित्रपटसृष्टीत चर्चा सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img