19.3 C
New York

Travel To Thailand : फक्त ₹10,000 मध्ये थायलंडची सफर! कमी बजेटमध्ये परदेशवारीची सफर

Published:

आजकाल भारतीयांमध्ये परदेशात फिरायची उत्सुकता प्रचंड वाढली आहे, (Travel To Thailand) आणि त्यात थायलंड हे एक आवडतं पर्यटन स्थळ बनलं आहे. थायलंडमधील सुंदर समुद्रकिनारे, बौद्ध संस्कृतीचे दर्शन घडवणारी मंदिरे आणि स्वच्छता यामुळे अनेक भारतीय पर्यटक तिथे आकर्षित होत आहेत. पण प्रश्न असा — फक्त ₹10,000 हातात घेऊन गेलात, तरी थायलंडमध्ये मजा करता येईल का? उत्तर आहे: होय!

थायलंडमध्ये वापरली जाणारी अधिकृत मुद्रा म्हणजे थाई बाहट (THB). सध्याच्या विनिमय दरानुसार, 1 भारतीय रुपया सुमारे 0.37 थाई बाहटच्या आसपास आहे. म्हणजेच ₹10,000 चे रूपांतर केल्यावर थायलंडमध्ये सुमारे 3,750 THB हातात येतात.

विनिमय दर स्थळाप्रमाणे वेगवेगळा असतो – विशेषतः विमानतळांवर थोडं महाग पडू शकतं. त्यामुळे थायलंडमध्ये पोहचल्यावर किंवा ऑनलाईन विश्वासार्ह एक्सचेंज सर्व्हिस वापरून पैसे बदलणे चांगला पर्याय ठरतो.

Travel To Thailand थायलंडमध्ये ₹10,000 मध्ये काय मिळू शकतं?

  1. राहणी: बँकॉकसारख्या शहरात 200 ते 500 THB मध्ये आरामदायक गेस्ट हाउस किंवा बजेट हॉटेल मिळतं. म्हणजेच एका रात्रीसाठी ₹500–₹1,000 मध्ये उत्तम राहण्याची सोय होते.
  2. खाणं-पिणं: थायलंडचं स्ट्रीट फूड चविष्ट आणि स्वस्त आहे. फक्त 60–65 THB (₹150–₹200) मध्ये तुमचं पोटभर जेवण होऊ शकतं. नूडल्स, फ्रायड राईस, पद थाई अशा लोकल डिशेस ट्राय करायला जरूर पाहिजे!
  3. प्रवास व शॉपिंग: स्थानिक तुक-तुक, टॅक्सी किंवा मेट्रो वापरून तुम्ही सहज प्रवास करू शकता. बाजारांमध्ये बरीच स्वस्त आणि आकर्षक खरेदी करण्यासारखी वस्तू मिळतात – विशेषतः कपडे, हातमागाचे उत्पादने, अ‍ॅक्सेसरीज वगैरे.

Travel To Thailand थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांची वाढती संख्या

2024 मध्ये तब्बल 21 लाख भारतीयांनी थायलंडला भेट दिली. ही संख्या चीन आणि मलेशियानंतर सर्वाधिक असून, भारत हा थायलंडसाठी तिसरा सर्वात मोठा पर्यटक देणारा देश बनला आहे. यामुळे थायलंडच्या पर्यटन क्षेत्रात भारतीयांची भूमिका महत्त्वाची ठरते

जरी भारतीय रुपया थायलंडमध्ये तुलनेने कमजोर असला, तरीही तिथे राहणीमानाचा खर्च कमी असल्यामुळे फक्त ₹10,000 च्या बजेटमध्येही तुम्ही थायलंडचा आनंद घेऊ शकता. थोडं नियोजन, योग्य ठिकाणी खर्च आणि स्थानिक अनुभवांनी तुमची ट्रिप अविस्मरणीय होऊ शकते!

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img