19.3 C
New York

Tammana Bhatiya : विराट आणि रझाकशी जोडल्या गेलेल्या अफेअरच्या अफवांना दिला सडेतोड प्रत्युत्तर

Published:

अभिनेत्री तमन्ना भाटिया ( Tammana Bhatiya ) ही केवळ तिच्या सौंदर्यानेच नव्हे तर अभिनय, डान्स आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी तमन्ना गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे.

अभिनेता विजय वर्मासोबत( Vijay Verma ) तिचं नातं चर्चेत आलं होतं, पण आता या दोघांचं ब्रेकअप झालं असल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान तमन्नाचं नाव क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli)आणि माजी पाकिस्तानी खेळाडू अब्दुल रझाकसोबतही (Abdul Razak ) जोडण्यात आलं होतं. अखेर तमन्नाने या अफवांवर पहिल्यांदाच मौन सोडत स्पष्ट भूमिका घेतली आहे.

एका अलीकडील मुलाखतीत तमन्नाने सांगितलं की, “विराटला मी फक्त एकदाच एका जाहिरात शूटिंगदरम्यान भेटले. त्यानंतर आमचं पुन्हा कधीच संपर्क झालेला नाही. मात्र, त्या एका फोटोवरून लोकांनी अफवा पसरवल्या, जे खूपच निराशाजनक होतं.”

अब्दुल रझाकसोबतच्या चर्चांवरही तमन्ना म्हणाली की, “त्या फोटोमध्ये आम्ही फक्त एका ज्वेलरी इव्हेंटसाठी उपस्थित होतो. इंटरनेटवरच्या अफवांनुसार तर मी काही काळासाठी त्यांच्या पत्नीची भूमिकाही पार पाडली होती! पण हे सगळं पूर्णपणे चुकीचं आणि लज्जास्पद आहे.”

तमन्नाने सांगितलं की, आता ती अशा अफवांकडे विनोदाने बघते कारण लोक काय विचार करतील हे आपल्या हातात नसतं.

तमन्ना भाटियाने 2005 मध्ये ‘चांद सा रोशन चेहरा’ ( Chand sa Roshan ) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं आणि ‘बाहुबली: द बिगिनिंग’ने(Bhaubali the begining) तिला संपूर्ण देशभरात प्रसिद्धी मिळवून दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img