मनसेने आगामी महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली असून, राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मतदारांना आकर्षित करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मराठीचा मुद्दा स्थानिक मुद्यांसाठी ग्राऊंडवर उतरुन काम करा तसेच घराघरात पोहोचवा पण राज ठाकरेंनी हिंदीचा द्वेष करू नका असा कानमंत्रही दिला आहे. ते मुंबईतील रंगशारदा येथे आयोजित मनसेच्या पदाधिकाऱ्याच मेळाव्यात बोलत होते. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीवर योग्यवेळी बोलेन. आदेशाची वाट पहा असेही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. आपापसातील हेवेदावे संपवून कामाला लागा असेही आदेशही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
Raj Thackeray BMC मध्ये 100 टक्के मनसे येणार
ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, 100 टक्के मनसे यंदाच्या पालिका निवडणुकांमध्ये BMC मध्ये विजयी होणार असल्याचा विश्वास राज यांनी व्यक्त केला. युतीचे काय करायचे ते माझ्यावर सोडा असे सांगत कुणालाही न घाबरता आत्मविश्वासाने कामाला लागा तसेच स्थानिक मुद्द्यांसाठी ग्राऊंड उतरून कामाला लागण्याच्या सूचना राज यांनी यावेळी दिल्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, “आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागा. 20 वर्षांनी आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडता? आपापसातले हेवेदावे संपवा आणि कामाला लागा,” अशा पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. “स्थानिक मुद्द्यांसाठी मैदानात उतरून काम करा. मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवताना हिंदी भाषेचा द्वेष करू नका. कोणालाही न घाबरता आत्मविश्वासाने काम करा,” असेदेखील आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतील त्यांना स्विकारा. मुंबई महानगरपालिकेत मनसे 100 टक्के सत्तेत येणार, असा विश्वास त्यांनी यावेळी दर्शवला असल्याचे सांगितले जात आहे.
“मतदार याद्यांच्या संदर्भात सूचना दिल्या. मतदार यादी तपासून घ्या, जुने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना निवडणुकीचा तयारीच्या अनुषंगाने सोबत घ्या. मतदार यादीवर विशेष काम करा आणि मतदार याद्या तपासा,” असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.