19.3 C
New York

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना तब्बल 42 लाखांचा दंड, नेमकं प्रकरण काय?

Published:

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याचे मुख्य आरोपी म्हणून नाव समोर आल्याने तत्कालीन अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनामा देऊन धनंजय मुंडे यांनी काही महिने उलटले आहेत. तरी सातपुडा हा शासकीय बंगला त्यांनी मलबार हिल येथील अद्याप सोडलेला नाही. त्यामुळे तब्बल ४२ लाख रुपयांचा त्यांना आतापर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे. तर महायुतीमधील मंत्री छगन भुजबळ दुसरीकडे या बंगल्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Dhananjay Munde काय आहे नेमके प्रकरण?

महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर धनंजय मुंडे यांना सातपुडा बंगला वाटप करण्यात आला होता. १५ दिवसांच्या आत मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सरकारी बंगला रिकामा करणे बंधनकारक असते. ४ मार्च रोजी मंत्रिपदाचा राजीनामा धनंजय मुंडे यांनी दिला होता. त्यानुसार २० मार्चपर्यंत त्यांनी बंगला सोडणे अपेक्षित होते. पण त्यांनी मुदतवाढ मागून अद्याप बंगला रिकामा केलेला नाही.

त्यातच छगन भुजबळ यांनी दुसरीकडे २० मे रोजी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर २३ मे रोजी सातपुडा बंगला देण्याचा शासकीय आदेशकाढण्यात आला. पण अद्याप कोणतीही नोटीस धनंजय मुंडे यांना बंगला रिकामी करण्याची पाठवण्यात आलेली नाही. सामान्य प्रशासन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

Dhananjay Munde धनंजय मुंडे काय म्हणाले?

तसेच ‘सातपुडा’ बंगल्याचे क्षेत्रफळ ४ हजार ६६७ चौ. फूट आहे. नियमांनुसार, १५ दिवसांत मंत्र्यांनी बंगला सोडला नाही, तर त्यांना प्रति चौ. फूट २०० रुपये दंड आकारला जातो. यामुळे, ९ लाख ३३ हजार रुपये दंड मुंडे यांना महिन्याला लागत असून, आता ४२ लाखांच्या घरात ही रक्कम पोहोचली आहे. याबद्दल धनंजय मुंडे यांनी नुकतंच प्रतिक्रिया दिली आहे. आजारपणामुळे मला मुंबईत राहणे आवश्यक आहे. माझ्या मुलीच्या शाळेचाही प्रश्न आहे. त्यामुळे निवासस्थान रिक्त करण्यासाठी मी मुदतवाढ मागितली आहे. याआधी अशा प्रकारे मुदतवाढ अनेक माजी मंत्र्यांना देण्यात आली आहे” असे धनंजय मुंडे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img