16.5 C
New York

Ayodhya Ram Temple  : आपल्याला आयोध्येतील राम मंदिर उडवायचय; बीडच्या तरुणाला पाकिस्तानातून सुपारी

Published:

बीडमधील एका तरूणाला अयोध्येतील राम मंदिर उडवून (Ayodhya Ram Temple)  देण्यासंबंधी मेसेज आल्याचा प्रकार समोर आला आहे. मंदिर उडवून देण्याच्या कटात सहभागी (Beed) होण्यासाठी १ लाख रुपयांची ऑफर संबंधित तरूणाला दिल्याची माहितीही समोर आली आहे. यानंतर बीड जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाण्यात घाबरलेल्या तरूणाने तक्रार दिली. या प्रकरणी यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे बीडमधील तरुण घाबरला आहे. त्याने तातडीने पोलिसांना कळवले आहे.

इतकंच नाही तर संशयिताने या तरुणाला पाकिस्तानातील लोकेशन देखील पाठवल्याचंही सांगितलं जात आहे. तसंच, या कामासाठी ५० जण हवे असून, त्यांना प्रत्येकी १ लाख रुपये देऊ आणि मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स पुरवू असंही या मेसेजमध्ये म्हटले होतं असं सांगितलं जात आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात या प्रकरणानेखळबळ उडाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

एक मुलगा त्याच्या इंस्टाग्रामवर बीड जिल्ह्यातील शिरूर कासार पोलीस ठाणे हद्दीतील रील पाहात होता. त्याने एक संभाजी महाराज चित्रपटासंबंधीची रील बघतली. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल त्यावरील कमेंट पाहिल्या असता आरोपीने आक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून या तरुणाने कमेंट करणे सुरू केले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या पर्सनल आयडीवर कमेंट करण्यास सुरूवात केली, त्यानंतर त्यांच्यात धार्मिक बाचाबाची सुरू होती. पोलिसांनी पण याबाबत त्याने काही माहिती दिली नव्हती. असं सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव म्हणाले.

या सर्व प्रकारानंतर त्याने एक ऑडिओ क्लिप इन्स्टाग्रामवर टाकली, ज्यामध्ये त्याने अयोध्या येथील मंदिर उडवायचे आहे आणि त्यासाठी काही मुलं लागणार आहेत, तेवढी मुलं आम्हाला पुरव, मी प्रत्येकी एक लाख रुपये देतो अशी ऑडिओ क्लिप पाठवली. यावर फिर्यादी मुलगा घाबरला आणि त्याने शिरुर कासार पोलीस ठाण्यात येऊन आम्हाला माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठांना आम्ही त्याबाबत माहिती देऊन त्याची तात्काळ दखल घेतली. एटीएसी आणि सायबर पोलिसांना माहिती देऊन तात्काळ गुन्हा नोंद केला आहे. शिरूर कासार पोलीस ठाणे तपास करत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img