ओतूर,Otur News :दि.३ जूलै ( रमेश तांबे )
ओतूर पोलीस स्टेशन हद्दित एक महीलेला व तिच्या पतीला पैशाचा पाऊस पाडून देतो असे सांगून,एका महिलेकडून दोन लाख रूपये रक्कम घेवून फसवणूक केल्या प्रकरणी ओतूर पोलिस व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने पाच जणांना अटक केली आहे.
याबाबत सुवर्णा प्रदीप ओवळ वय ३७,मूळ रा. ४२ चीलठण ता.डोंवत जि.रायगड सध्या रा. आंबेठाण चाकण तालुका खेड जिल्हा पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी अरूण लिखरे मुकणे, रा. वसद शेलवली, अंबरनाथ, ता. कल्याण, जि.ठाणे,गौरख विश्वास शिंदे, रा. निमगाव सावा, ता.जुन्नर, जि. पुणे, राजेंद्र पद्माकर भले, रा. मोरोशी, ता. मुरबाड, जि.ठाणे,रशीद अहमद शेख, रा. बळेगाव टोकावडा, ता. मुरबाड, जि.ठाणे, गुरूनाथ गंगाराम वाघ, रा. खरोड अंबरनाथ, ता. कल्याण,जि.ठाणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक लहू थाटे हे अधिक माहिती देताना म्हणाले की,ओतूर पोलीस स्टेशन हद्दित दिनांक २० मे २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वा. चे सुमारास इसम नामे आदेश महाराज, अरूण मुकणे व गणेश वाघ यांनी गुन्ह्याचा कट रचुन फिर्यादी महीला सुवर्णा ओवळ व फिर्यादी सुवर्णा यांचे पती प्रदीप ओवळ यांना पैशाचा पाऊस पाडुन देतो असे सांगुन,त्यांचा विश्वासघात करून फिर्यादी यांचेकडुन दोन लाख रूपये रक्कम घेवुन फसवणुक केली असलेबाबत तक्रार ओतूर पोलीस स्टेशन येथे सांगुन दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी सदर इसम हे आणखी दोन इसमांची अशाच प्रकारे फसवणुक करणार असल्याचे फिर्यादी सुवर्णा ओवळ यांनी सांगितले. फिर्यादी यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वा. चे सुमारास ओतुर पोलीस स्टेशन पोलीस पथक व स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पुणे ग्रामीण कडील पोलीस स्टाफ असे सापळा रचला असता १) अरूण लिखरे मुकणे, २) गौरख विश्वास शिंदे, ३) राजेंद्र पद्माकर भले, ४) रशीद अहमद शेख, ५) गुरूनाथ गंगाराम वाघ असे सर्वजण मौजे खुबी, ता. जुन्नर, जि.पुणे गावचे हद्दित भांगलेवस्ती येथे असलेल्या पत्राशेडजवळ पैशाचा पाउस पाडुन देतो असे सांगुन विश्वासघात करून फसवणुक करत असताना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी फिर्यादी महीला व तीचे पती यांना पैशाचा पाउस पाडतो असे सांगुन त्यांचेकडुन दोन लाख रूपये रक्कम घेवून,त्यांची फसवणुक केली असल्याचे सांगितले. सदर फसवणुकी बाबत ओतूर पोलीस स्टेशन येथे नोंदविले फिर्यादी जबाबावरून दि.१ ऑगस्ट रोजी ओतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.
नमुद आरोपी यांचेकडुन गुन्हा करताना वापरलेले वाहन प्रवासी रिक्षा नं.एम.एच.०५.ई.एक्स. ९८४१ हे हस्तगत करण्यात आले आहे.
या गुन्ह्यातील अटक आरोपी सदर गुन्ह्यात दि. १ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून आज दि.२ रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साो., जुन्नर न्यायालय यांचे समक्ष हजर करणेत आले असता सदर आरोपींची ३ दिवस पोलीस कस्टडी मंजुर केली आहे.
सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस.निरिक्षक लहु थाटे,पो.हवा.नामदेव बांबळे, भरत सुर्यवंशी, नदिम तडवी, शंकर कोबल, पो.कॉ. रोहीत बोंबले, अमोल शिंदे, संतोष भोसले, आशिष जगताप, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पुणे ग्रामीण चे सहा. फौजदार दिपक साबळे, पो.हवा. अक्षय नवले यांनी केली आहे.
दाखल गुन्ह्याचा तपास मा. वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पो. हवा.संदिप लांडे हे करत आहेत.