जम्मू-काश्मीरमधून (Jammu Kashmir) मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत धुमश्चक्री सुरू आहे. सर्च ऑपरेशन पहलगामनंतर मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात येत आहे. (Kashmir)त्यात दक्षिण काश्मीरमधील कुलगाम परिसरात जोरदार गोळीबार सुरू आहे. त्यात आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातलं आहे. तर, एक जवान जखमी झाला आहे. आणखी दोन दहशतवादी लपून बसल्याचे समोर आलं आहे. त्यांचा शोध सुरूच आहे.
दहशतवाद्यांना शोधण्यासाठी व्यापक शोध मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये हायटेक सर्व्हिलांस सिस्टिम, विशेष अर्धसैनिक दलाची तुकडी, जम्मू काश्मीर डीजीपी, लष्कराची 15 वीं कोर हे सर्व मिळून अँटी टेरर ऑपरेशनवर करडी नजर ठेऊन आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी स्पेशल ऑपेरशन ग्रुप, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान दिलेल्या माहितीनुसार, यांचे हे संयुक्त अभियान आहे. यामध्ये दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करण्यात येत आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याने महत्त्वाची माहिती दिली. त्यानुसार गुप्त माहिती मिळाल्यानंतर 1 ऑगस्ट रोजीपासून दक्षिण काश्मीरमध्ये व्यापाक शोध मोहीम राबवण्यात आली. मोहीम सुरू होताच घाबरलेल्या दहशतवाद्यांनी अखल दाट जंगलात सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. जम्मू काश्मीरमध्ये या आठवड्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तिसऱ्यांदा चकमक उडाली. सुरक्षा दलांनी ऑपरेशन महादेव राबवले.
लष्कर-ए-तैयब्बाचा प्रमुख कमांडर सुलेमान हा पहलगाम आणि गगननीर दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. 29 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत सांगितले की, या तीनही पाकिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. 26 निर्दोष पर्यटकांची 22 एप्रिल 2025 रोजी बैसरन घाटीत या दहशतवाद्यांनी हत्या केली होती. सैन्याकडून अजूनही शोध मोहीम सुरूच आहे.v