13 वर्षांनंतर अजय देवगण (Ajay devagan) पुन्हा जस्सीच्या रूपात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. 2012 मध्ये आलेल्या ‘सन ऑफ सरदार’ या सुपरहिट विनोदी सिनेमाचा दुसरा भाग, म्हणजेच ‘सन ऑफ सरदार 2’ अखेर थिएटरमध्ये दाखल झाला आहे.
या भागात कहाणी जस्सीच्या लग्नापासून सुरू होते, मात्र पत्नी (नीरू बाजवा) त्याला घटस्फोट देते. खचलेल्या जस्सीचं आयुष्य लंडनमध्ये बदलतं, जिथे त्याची ओळख पाकिस्तानी रबिया (मृणाल ठाकूर) (Mrunal thakur)शी होते. रबियाची मुलगी एका भारतीय मुलाच्या प्रेमात पडते, पण त्या कुटुंबाला पाकिस्तानचा राग असतो. अशा कठीण प्रसंगी जस्सी तिच्या मुलीचा खोटा वडील म्हणून पुढे येतो आणि मग सुरू होतो गोंधळ, मजा आणि अनेक ट्विस्ट.
विजय कुमार अरोरा (Vijaykumar Arora) यांचा हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. त्यांनी सिनेमाला ठसठशीत पंजाबी ट्रीटमेंट दिली आहे. जर तुम्ही फक्त हसायचं म्हणून सिनेमा बघायला येत असाल, तर हा सिनेमा तुमच्यासाठी ‘परफेक्ट टाइमपास’ (Perfect timepass) ठरेल. पण जर तुम्ही जरा बारकाईने बघणारे, कॉन्टेंट-ओरिएंटेड प्रेक्षक असाल, तर अनेक विनोद खटकू शकतात.
अजय देवगणने एकट्याने संपूर्ण सिनेमा खांद्यावर घेतला आहे. त्याचं कॉमिक टायमिंग जबरदस्त आहे. मृणालने रबियाच्या बोल्ड आणि वेगळ्या भूमिकेत चांगला टच दिला आहे. रवी किशन, मुकुल देव, विंदू दारा सिंग, संजय मिश्रा, आणि बाकीच्या स्टारकास्टनेही धमाल केली आहे. विशेषतः मुकुल देवचा अभिनय पुन्हा पाहायला मिळणार नाही याची खंतही प्रेक्षकांना वाटतेय.
जर तुम्हाला दोन तास फक्त दंगामस्ती करायची असेल, मेंदू थांबवून हसायचं असेल – तर ‘सन ऑफ सरदार 2’ नक्कीच पाहायला हवा. मात्र, जर तुम्ही इनोवेटिव्ह स्क्रिप्ट आणि संदेश देणाऱ्या सिनेमाच्या शोधात असाल, तर याची शैली तुम्हाला बाळबोध वाटू शकते.