उद्योग क्षेत्रात, व्यापारात एक मोठा दबाव पाहायला मिळतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आमच्याकडूनच खरेदी करा, आमचीच माणसं घ्या. आम्हालाच कंत्राट द्या, त्याच आम्ही म्हणतो दराने काम द्या. ही मानसिकता जर आपण संपवली नाही, तर पुण्याचा विकास पुढे होवूच शकणार नाही, असा इशारा दिलाय. ‘पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब’ या (Pune News) उपक्रमाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) त्यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झालं. यावेळी ते बोलत होते. त्यांनी पुणे आर्थिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नीती आयोग, महाराष्ट्र शासन आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्यातील ‘स्टेटमेंट ऑफ इंटेंट’ यावर स्वाक्षरीत केली.
CM Devendra Fadnavis फडणवीसांचा धक्कादायक खुलासा
नीती आयोगाचे सीईओ येतात, पुण्याची तारीख करू शकतात. आपल्याला वाटतं, वी आर दी बेस्ट. पण काही लोकं काही क्षेत्रांत, आपल्या पुढे निघून गेलेले आहेत, असं देखील यावेळी मुख्यमंत्री यांनी म्हटलंय. आपण ऐतिहासिक प्रकारच्या लिडरशीपमध्ये राहिलो तर, आपली परिस्थिती ‘खंडलेल्या गावचा पाटील’ अशी होईल. ग्रोथ हबचा प्रयोग करायचा आहे, त्यात प्रशासनासह सर्वांना प्रयत्न करावा लागेल. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा डायनॅमिक एरिया पुणे आहे.
जे संभाजीनगर कालपर्यंत कुठेही पुण्याच्या आसपास नव्हतं, ते आता पुण्याला मागे टाकत आहे, असं देखील फडणवीसांनी म्हटलं. पुणेकरांमध्ये क्षमता आहे. अशावेळी नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपली स्ट्रेंथ तयार करू शकतात. पुणे इनोव्हेशनचं केंद्र आहे, असं देखील फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. यावेळी त्यांनी नीती आयोगाचे देखील आभार मानले. महाराष्ट्र कदाचित पहिलं राज्य असेल, जिथे आपण इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रोथ हब तयार करत आहोत. विकसित महाराष्ट्राच्या दिशेने यामाध्यमातून वेगाने वाटचाल करण्यासाठी मदत मिळणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.