शेतकरी कामगार पक्षाचा (शेकाप) 78वा वर्धापन दिन पनवेल येथे साजरा होत आहे. शेकापच्या वर्धापन दिन सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) उपस्थित झाले आहेत. यावेळी मंचावर महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने आहेत. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, माजी आमदार राजू पाटील देखील शेकापच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील देखील मंचावर उपस्थित आहेत.
Raj Thackeray राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
– मागील दोन दिवसांपासून तब्येत नरम आहे
– माझी सकाळी येण्यापर्यंत ताकत नव्हती मी आज केवळ जयंतराव यांच्या प्रेमाखात आलो आहे
– पावसाळा कमी झाल्यानंतर पनवेल मध्ये सभा घेणार
– काय झालंय ते डॉक्टर सांगत नाहीत
– पूर्वीचे आजार ताट मानेने नाव घेऊन समोर यायचे हल्लीचे आजार समोर येत नाहीत
– हल्लीची आजार आणि सध्याचे महाराष्ट्राचे राजकारण वेगळे नाही
– हा एका पक्षात तुमच्या पक्षात गेला त्या पक्षातून पक्षात गेला त्याला म्हटलं जातं व्हायरल होता
– महाराष्ट्रात वायरल खूप होत आहे
– भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष
– महाराष्ट्रात स्वतंत्र पूर्व काळात निर्माण झालेला हा एकमेव राजकीय पक्ष
– तिच्या वर्षानंतर हे टिकून आहे आश्चर्य
– शिवसेनेचे पहिलं अधिवेशन झालं त्यावेळेला
– शिवसेना आणि कम्युनिस्टन मध्ये कधीच बाहेर नव्हतं
– राजकारण नेहमी मोठ्या मनाचा होता पण आता हे मोठं मन आता संकोचित व्हायला लागले
– भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासाठी
– आणि आज लाल व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज आलेले आहेत
– मला शेकापा वरती बरच काही बोलायचं होतं
– मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर ती दुसऱ्यांदा येतो आहे
– पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या प्रचारासाठी मी जयंत रावांसोबत होतो
– राजकीय पक्ष असतात निवडणुका होतात निवडणुका लढवल्या जातात
– मात्र पक्षाचा विचार न करता महाराष्ट्र आणि जिल्ह्यांचा विकास तुम्ही समजून घेतलं पाहिजे
– जेव्हा जेव्हा ही आठवण येते काही आलेली आहे त्यावेळेला राज्यकर्त्यांचे लक्ष नसेल तर तो प्रदेश बरबाद व्हायला वेळ लागत नाही
– महाराष्ट्रातलं सरकारी याकडे लक्ष न देता महाराष्ट्रातील नेते महाराष्ट्रात हिंदी कसा आणता येईल याकडे लक्ष देते
– पण महाराष्ट्रामध्ये मराठी कसं शिकवता येईल याकडे सरकारचं लक्षण आहे
– या रायगड मधील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत कुठे जात आहेत माहिती नाही व्यवहार करणारे कळलं तर कुंपण शेत खात आहेत
– शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत उद्योगधंदे येत आहेत पण या उद्योग धंद्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरील लोक येतात.
– या देशाचे पंतप्रधान या देशाचे गृहमंत्री दोघेही गुजराती आहे
– देशाचा गृहमंत्री ठणकावून सांगतो की मी हिंदी नाही मी गुजराती आहे
– आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हे गुजरातला गेलेले आहेत
– प्रत्येक राज्याला आपल्या राज्यातील प्रेम असतं मग आपण बोलल्यानंतर दुसऱ्या संकुचित का होतात
– रायगड मधील शेतकऱ्यांच्या जमिनी कुठे जात आहे तर मग या शेतकरी कामगार पक्षाचा फायदा काय जयंत पाटील तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी आणि त्यांचा हक्क शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी रायगडचा सगळा राजकारण तुमच्या हातात
– तुमची भाषा संपली आणि एकदा तुमची जमीन केली तर जगाच्या नकाशावरती तुम्हाला कुठे स्थान नाही
– गुजरात मधील जमिनी शेत जमिनी या देशातील कोणताही नागरिक विकास होऊ शकत नाही
– एका प्रेमाच्या कायद्याचं पालन करून जर का ती जमीन विकत घ्यायची असेल तर ती घ्यावी लागेल
– या रायगड मध्ये कोण जमिनी विकत घेत आहेत कोण येतंय कोण राहतंय काहीच माहित नाही
– उत्तर भारतातील अनेकांनी महाराष्ट्रातल्या कोकणातील जमिनी विकत घेतल्यात आहेत
– त्यांना समजत नाही की आता आपणही संपणार आहोत
– यापुढे तुमच्या उद्योगांसाठी तुमच्या जमिनी विकत घेण्यासाठी आले तर नुसत्या जमिनी विकत घ्यायचा नाही तर त्या विकत घेणाऱ्या उद्योजकांच्या मध्ये तुम्ही राहायचं.
– उद्या याच मराठी आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी आमदार खासदार नगरसेवक निवडून येतील.
– या ठिकाणी जेवढा डेव्हलपमेंट शेत आहेत त्या ठिकाणी मराठी मुलं ही कामाला लागली पाहिजे
– बाहेरची मुलं येणार आणि कसे काम करणार वाटेल तो थैमान घालणार
– जमिनी बाबत राज्य सरकारने कायदा आणला
– तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात
– तुम्ही जर विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करेल
– एकदा सरकारने यांना अटक करू दे
– या महाराष्ट्रातील थोडक्यावरती उद्योग आणता येणार नाही तर तुम्हाला उद्योग आणत असतील तर या महाराष्ट्रातील मराठी माणसाचा माणसान्मान राखावाच लागेल.