15.8 C
New York

BMC Election : भाजपचं ‘गुजराती कार्ड’! ठाकरे बंधू एकत्र येताच, नव्या रणनीतीचा खेळ सुरू…

Published:

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक अजून जाहीर झालेली नसली, तरी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे, 18 वर्षांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) एका व्यासपीठावर एकत्र आल्यामुळे महापालिकेच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.

BMC Election युतीची शक्यता आणि रणनीतीतील बदल

उद्धव आणि राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या विजयी मेळाव्यात मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी आपण एकत्र आलो आहोत, असे स्पष्टपणे सांगितले. या दोघांचा ‘एकत्र’ येण्याचा संदेश इतका प्रभावी होता की, शिंदे गट आणि भाजपला आपली रणनीती (BJP Plan) पुन्हा आखावी लागली आहे.

यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त (Gujarati Drama) राज ठाकरे ‘मातोश्री’वर पोहोचले आणि शुभेच्छा दिल्या. हे दृश्य पाहून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या की, या दोन बंधूंमध्ये युतीची घोषणा लवकरच होऊ शकते. अद्याप युतीची अधिकृत घोषणा झाली नसली, तरी उद्धव ठाकरे यांचे “एकत्र आलो आहोत, एकत्र राहणार आहोत” हे वाक्यच या संभाव्य युतीच्या चर्चांना बळ देत आहे.

BMC Electionभाजपचं ‘गुजराती कार्ड’

उद्धव-राज युतीची शक्यता लक्षात घेता भाजपने आपली मतं मजबूत करण्यासाठी गुजराती समाजाला आकर्षित करण्याची रणनीती सुरू केली आहे. मुंबईत गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भाजपने विशेष लक्ष त्या समाजावर केंद्रित केलं आहे.

BMC Electionमहापालिकेत वर्चस्व राखण्यासाठी नवा डाव

या पार्श्वभूमीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन भाजपच्या माध्यमातून सुरू झालं आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी मार्फत कांदिवलीत ‘स्त्री अेटले’ या गुजराती नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आला आहे. हा कार्यक्रम 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्यावर मंत्री आशिष शेलार यांचे नाव आहे.

या नाट्यप्रयोगाला मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, साहित्याला आमचा विरोध नाही, पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुद्दाम गुजराती कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय, म्हणून विरोध करतोय. तसेच, मराठी साहित्य संमेलन इतर राज्यांमध्ये जाऊन करून दाखवण्याचं आव्हानही त्यांनी सरकारला दिलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img