15.8 C
New York

Actress Tara Sutaria : तारा सुतारिया पुन्हा प्रेमात! वीर पहाडिया सोबत डेटिंगच्या चर्चाना उधाण

Published:

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutariya) सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही काळ ती रणबीर कपूरचा (Ranbeer Kapoor) भाऊ आदर जैन (Adar Jain) याला डेट करत होती, पण दोघांचं नातं ब्रेकअपवर येऊन थांबलं. आता ती पुन्हा एका नव्या नात्यात आहे, आणि हे नातं एका राजकीय कुटुंबाशी संबंधित आहे.

एका शोमध्ये तिनं तिच्या रिलेशनशिपबाबत बोलताना सांगितलं की, ती सध्या खूप आनंदी आहे आणि प्रेम हे तिच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. तिनं नाव घेतलं नाही, पण बोलण्यावरून स्पष्ट संकेत मिळाले की ती वीर पहाडिया सोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

वीर पहाडिया याचं नाव यापूर्वी सारा अली खानसोबत जोडलं गेलं होतं. त्याचा भाऊ शिखर पहाडिया जान्हवी कपूरला डेट करत आहे. शिखर आणि वीर हे दोघेही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू आहेत.

सध्या तारा आणि वीर अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत, त्यामुळे ही चर्चा आणखी जोर धरतेय की तारा सुतारिया महाराष्ट्राच्या राजकीय घराण्यात सून म्हणून प्रवेश करणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img