21.3 C
New York

Rajesh Khanna : राजेश खन्ना यांच्या बायोग्राफीत उघडं झाली ‘ती’ गोष्ट

Published:

हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना यांनी 1960-70 च्या दशकात बॉलीवूडवर अक्षरशः अधिराज्य गाजवलं. त्यांचे आराधना, आनंद, कटी पतंग, नमक हराम, बावर्ची यांसारखे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. यशाच्या शिखरावर असताना त्यांच्या चाहत्यांची संख्या अफाट होती. विशेषतः महिला चाहत्यांमध्ये त्यांची क्रेझ इतकी होती की त्याच्या कारलाही त्या किस करत असत.

राजेश खन्ना हे केवळ अभिनयासाठी नव्हे तर त्यांच्या उदार स्वभावासाठीही प्रसिद्ध होते. परदेश दौऱ्यांहून ते आपल्या मित्रांसाठी महागड्या आणि खास भेटवस्तू घेऊन यायचे. मात्र त्या कोणाला द्यायच्या हे ते अनेकदा विसरायचे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या ‘आशीर्वाद’ या बंगल्यात तब्बल 64 सुटकेसे सापडल्या होत्या. त्या सर्व सुटकेसमध्ये अनेक अमूल्य भेटवस्तू होत्या ज्या त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी ठेवलेल्या होत्या. पण दुर्दैवाने त्या वस्तू वितरित होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांची ती शेवटची इच्छा अधुरीच राहिली.

लेखक गौतम चिंतामणी यांच्या ‘Dark Star: The Loneliness of Being Rajesh Khanna’ या बायोग्राफीत ही बाब उघड झाली. या पुस्तकात असंही नमूद आहे की राजेश खन्ना हे एकटे राहणं पसंत करत असले तरी लोकांवर निस्सीम प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व होते. 18 जुलै 2012 रोजी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांच्या आठवणी, प्रेम आणि अपूर्ण राहिलेली भेटवस्तूंची ती गोष्ट आजही लोकांच्या मनाला भिडते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img