कोल्हापूरच्या (Kolhapur) नांदणी मठातील (Nandani Math) महादेवी हत्तीण (Mahadevi Elephant) अखेर गुजरातच्या (Gujarat) वनताराकडे (Vantara) रवाना झाली आहे. हत्तीणीला निरोप देताना सर्व ग्रामस्थ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. लाडक्या महादेवीला निरोप देण्याआधी ग्रामस्थांनी हत्तीणीची मिरवणूक काढली होती. महादेवीच्या निरोपावेळी गावात भावूक वातावरण आणि सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू आले. एवढंच काय तर इतकी वर्ष ग्रामस्थांसोबत त्यांच्याच कुटुंबातील सदस्याप्रमाणे राहिलेल्या महादेवीलाही आश्रू अनावर झाले. त्याचबरोबर गावकऱ्यांच्या मनात भावनिक असंतोष निर्माण झाला. अनेकांनी न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर हत्तीणीला पुन्हा नांदणीत आणण्याची मागणी सुरू केली. तसेच, याचा संताप अनेकजण जियोवर बहिष्कार घातला आहे. याच मुद्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
700 वर्षांची परंपरा खंडित करण्याचे काम कायद्याच्या माध्यमातून झाले आहे. हत्ती इथेच राहावा यासाठी सरकारने स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे. केरळ सारख्या राज्यात तिथला हत्ती बाहेर जात नाही, महादेवीसाठी सुद्धा बंद न घातली असती, तर इथला हत्ती बाहेर गेला नसता. 700 वर्षांची परंपरा असलेल्या या मठाच्या अधिपत्यात ही परंपरा चालू आहे. परंपरा मोडल्यामुळे सर्वच नाराज आहेत. 32 शिराळ्याच्या नागपंचमीला जी भूमिका घेतली, तीच भूमिका महादेवी हत्तीबाबत घ्यावी. याबाबतीत सकारात्मक भूमिका सरकारने घेतली असती, तर हा प्रसंग टळला असता. सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन सुद्धा यश आलेले नाही, इथला हत्ती जाणार नाही अशी या शांतता प्रिय जनतेची भूमिका होती मात्र तसं झालं नाही. हत्ती परत यावा यासाठी चा लढा यापुढेही तीव्र होईल असे मला वाटते. सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळाला नसला, तरी राष्ट्रपती अशा निर्णयामध्ये मध्यस्थी करू शकतात. त्यामुळे अजूनही महादेवी हत्तीणीबाबत आम्ही आशावादी आहोत. आम्हाला कोर्टाचा अवमान करायचा नाही. मात्र नांदणीच्या 700 वर्षांच्या परंपरेबाबत असं होत असेल, तर मठाधिपती लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लढा सुरू ठेवला जाईल.