19 C
New York

Malegaon Bomb Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाचा धक्कादायक निर्णय

Published:

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल जाहीर झाला आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. आरोपींना संशयाच्या आरोपांवर शिक्षा होऊ शकत नाही, न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं आहे. याच प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर अन्य सहा जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. एनआयए कोर्टात मालेगाव बॉम्बस्फोटाची गुरुवारी (ता. 31 जुलै) सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणात सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात गुरुवारी सकाळी 11 वाजता मालेगाव बॉम्बस्फोटाच्या सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी बॉम्ब ब्लास्ट झाल्याचे सरकारी पक्षाकडून सिद्ध करण्यात आले. पण ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी वकीलांना अपयश आल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले. नक्कीच ही घटना दुर्दैवी होती, असे कोर्टाने म्हटले. पण तपासात अनेक त्रुटी होत्या. या सगळ्या त्रुटीचे वाचन देखील न्यायालयात करण्यात आले. पंचनामा योग्य नव्हता. जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही, असे निरिक्षणही न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे पुराव्यांच्याअभावी मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचेही यावेळी न्यायालयाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

Malegaon Bomb Blast Case आजच्या सुनावणीत काय घडलं?

आरडीएक्सची कर्नल पुरोहित यांनी व्यवस्था केली होती, असा आरोप केला गेला. परंतु प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नसल्याचं न्यायालयाने म्हटलं. बाईक व्यतिरिक्त काही ठिकाणी बॉम्ब होते, स्फोटात 95 जण जखमी झाले. दगडफेक झाली होती, गोळीबार सुद्धा झाला होता, असा युक्तिवाद सरकारने केला. बाईकवर ब्लास्ट झाला नाही. पंचनामा व्यवस्थित झाला नाही.

Malegaon Bomb Blast Case न्यायालयीन घडामोडी

2018 मध्ये या प्रकरणात प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. न्यायालयानं 323 साक्षीदार तपासले, मात्र त्यातील 37 साक्षीदारांनी आपली जबाबे बदलली. एटीएसने मोक्का (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता, पण तो नंतर मागे घेण्यात आला. साध्वी प्रज्ञासिंह यांनी आपल्याला राजकीय हेतूनं गोवलं गेलं असल्याचा दावा केला आहे. कर्नल पुरोहित यांनीही आपल्या विरोधात ठोस पुरावे नसल्याचं म्हटलं आहे. एनआयएने साध्वी प्रज्ञा यांना आरोपींच्या यादीतून वगळण्याची मागणी केली होती, पण न्यायालयानं ती फेटाळली आणि त्यांच्याविरोधात आरोप चालू ठेवले.

Malegaon Bomb Blast Case आरोप काय?

सात आरोपींवर युएपीए (UAPA) अंतर्गत दहशतवादी कृत्य करणे, त्याचा कट रचना, हत्या, हत्येचा प्रयत्न आणि धार्मिक तेढ वाढवण्याचे आरोप आहेत. विशेष म्हणजे एनआयएने या सर्व आरोपींसाठी मृत्युदंडाची मागणी केली आहे. याप्रकरणी आज (31 जुलै) विशेष NIA न्यायालय आपला निकालाने दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img