19 C
New York

Sadhvi Pragya : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटकेनंतर साध्वी प्रज्ञा कडाडल्या

Published:

मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी (Malegaon Bomb Blast Case) आज निकाल जाहीर केला. या अन्य सात आरोपींसह माजी खासदार साध्वी प्रज्ञा (Sadhvi Pragya) निर्दोष सुटल्या आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. देव (Mumbai NIA Court) ‘भगव्या’चा अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शिक्षा करेल, प्रज्ञा ठाकूर यांनी असं वक्तव्य मालेगाव प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर केलंय.

Sadhvi Pragyaसाध्वी प्रज्ञा काय म्हणाल्या?

साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, त्यांच्यावर चुकीचे आरोप लावण्यात आले होते. निर्दोष आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांना वारंवार लढा द्यावा लागला. अनेक वर्षे अपमान सहन करत होते. वारंवार संघर्ष करावा लागला. कलंकित दोषी नसतानाही ठरवण्यात आले, साध्वी प्रज्ञा यांनी अशा भावना रडून व्यक्त केल्याचं न्यायालयीन निरीक्षक म्हणाले आहेत.

आज भगवा जिंकला आहे, हिंदुत्व जिंकले आहे, भगवा दहशतवादाचा आरोप खोटा सिद्ध झाला आहे, असं देखील साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलंय. भगव्या’चा अपमान करणाऱ्यांना देव शिक्षा करेल, असा देखील इशारा त्यांनी दिलाय.

Sadhvi Pragya कर्नल पुरोहित यांची प्रतिक्रिया

2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांना न्यायालयातच रडू कोसळले. न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर भावनिक भाषण करताना ठाकूर यांच्या डोळ्यात पाणी होते. कारण त्यांनी संघर्ष आणि अपमानाच्या दीर्घ वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. या प्रकरणातून निर्दोष सुटलेले आणखी एक आरोपी कर्नल श्रीकांत पुरोहित यांनीही न्यायालयात मोठं विधान केलंय. मी एक सैनिक आहे, देशावर निःशर्त प्रेम करतो. देश नेहमीच सर्वोच्च असतो, त्याचा पाया मजबूत असला पाहिजे. काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केला, आम्हाला ते सहन करावे लागले. जय हिंद, असं त्यांनी म्हटंलय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img