काही महिन्यांवर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष त्यानिमित्ताने जोरदार तयारीला लागले (Nana Patole) आहेत. सत्ताधारी भाजपा–शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीत विविध पक्षांमधून नेत्यांचे ‘इन्कमिंग’ सुरू आहे. त्यात सर्वाधिक काँग्रेसमधून (Congress) जाणाऱ्यांची संख्या आहे. पळ काढणाऱ्या नेत्यांना त्यामुळे काँग्रेसला (Harshvardhan Sapkal) संघटना मजबूत करण्याबरोबरच रोखण्याचे दुहेरी आव्हान उभे राहिले आहे.
Nana Patole नवनियुक्त अध्यक्षांचा संघटनात्मक प्रयत्न
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी नुकतेच विराजमान झालेल्या हर्षवर्धन सपकाळ यांनी जुन्या-नव्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन संघटना पुन्हा सक्षम करण्याची भूमिका मांडली होती. तब्बल 350 हून अधिक सदस्यांची त्यानुसार मंगळवारी काँग्रेसची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात (Maharashtra Politics) आली. यात जुन्या आणि नव्या चेहऱ्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे काही जणांकडून यावर ‘लग्नातले घोडे रेसमध्ये, रेसमधले घोडे लग्नात’ अशा शब्दांत टिप्पणी होत आहे.
Nana Patole जेष्ठ आणि तरुणांचा समावेश
प्रदेश प्रभारी म्हणून रमेश चेन्निथला यांच्यावर पुन्हा जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली 36 सदस्यांची राजकीय व्यवहार समिती जाहीर झाली आहे. या समितीत हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, रजनी पाटील, मानिकराव ठाकरे, नाना पटोले, वर्षा गायकवाड, इमरान प्रतापगिरी, सुनील केदार, डॉ. नितीन राऊत, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, शिवाजी मोघे, चंद्रकांत हंडोरे, अरिफ नसीम खान, प्रणिती शिंदे यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
Nana Patole पदांची यादी
राजकीय व्यवहार समिती – 36 सदस्य
वरिष्ठ उपाध्यक्ष – 16
उपाध्यक्ष – 38
वरिष्ठ प्रवक्ते – 05
सरचिटणीस – 108
चिटणीस – 95
कार्यकारी समिती – 87 सदस्य
अभय छाजेड यांची खजिनदारपदी नियुक्ती झाली असून, प्रज्ञा सातव, मोहन जोशी, रमेश बागवे, कल्याण काळे, अनिस अहमद आदी वरिष्ठ उपाध्यक्ष झाले आहेत.
Nana Patole अळीमिळी गुपचिळी, अंतर्गत नाराजी
जंबो कार्यकारिणीत सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न झाला असला तरी, अंतर्गत नाराजीचे सूर ऐकू येत आहेत. जुन्या नेत्यांना पुन्हा मानाचे स्थान देणे, ही काँग्रेसची मजबुरी असल्याचे काहींचे मत आहे. अनेकांच्या अपेक्षा यादीत पूर्ण झालेल्या नाहीत. काहींना हवे असलेले ‘प्रमोशन’ मिळाले नाही. उदाहरणार्थ, अतुल लोंढे यांनी कठीण काळात पक्षाची बाजू सांभाळली असली तरी त्यांना अपेक्षित बढती मिळाली नाही. ते गेल्यावेळी मुख्य प्रवक्ते आणि सरचिटणीस होते. मात्र, त्यांची वरिष्ठ प्रवक्त्याच्या भूमिकेत नियुक्ती झाली. त्यामुळे गटातटाच्या राजकारणात अतुल लोंढे यांचा बळी गेला असल्याचं बोललं जात आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमधील आणि पदाधिकाऱ्यांमधील समन्वय योग्य रीतीने राहावा. पक्षाला अंतर्गत गटबाजीचा फटका बसू नये, याची पुरेपूर काळजी पक्षश्रेष्ठींनी घेतली. तरी दुसऱ्या बाजूला फक्त पदांच्या खैराती वाटल्याचं दिसते आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.