राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून काही भागात पाऊस (Heavy Rain) ओसरल्याचे चित्र आहे. मात्र, काही भागात पावसाने विश्रांती घेतलेली नाही. काही भागात आजही भारतीय हवामान खात्याने अलर्ट जारी केलाय. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात पाऊस चांगला असल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवलाय. पंढरपुरकडेही पाऊस चांगला असल्याने धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे. दरवर्षापेक्षा यंदा राज्यात मॉन्सून लवकरच दाखल झाला. मॉन्सूनच्या पावसाचा जोर विशेष म्हणजे राज्यातील जवळपास सर्वच ठिकाणी बघायला मिळाला.
Heavy Rain भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा
भारतीय हवामान खात्याकडून विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा येलो अलर्ट हा जारी करण्यात आलाय. विजेंच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाच्या सरी राज्यातील इतर ठिकाणी मध्यम स्वरूपात कोसळतील. बाकी ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये आज सकाळपासूचन पावसाला सुरूवात झाल्याचे बघायला मिळाले.
Heavy Rain विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला
आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता देशातील इतर भागांमध्ये वर्तवण्यात आली. जुलै महिन्याच्या अखेरीस जोरदार पाऊस पडताना दिसला. मात्र, आता परत पाऊस कमी जास्त होताना दिसतोय. राज्यातील काही भागांमध्ये अजूनही चांगल्या पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड या भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे.
नागपूर, अमरावती, वर्धा, गोदिंया, गडचिरोली, चंद्रपूर या भागात आज भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भात यंदा चांगलाच जोरदार पाऊस झाला आहे. अनेक नद्या भरून वाहत आहेत. गडचिरोलीच्या काही भागांचा मध्यंतरीच्या पावसाने संपर्क देखील तुडला होता. खडकवालसला धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने लगतच्या भागांना सुरक्षेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात देखील आज पाऊस हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात सतत पाऊस दिसतोय.