24.5 C
New York

Tsunami Updates : रशियात भूकंपानंतर त्सुनामीचा तडाखा

Published:

तब्बल 72 वर्षांनंतर रशियाला बुधवारी (30 जुलै) 8.8 रिश्टर स्केल (Tsunami Updates) एवढ्या शक्तिशाली भूकंपाचा सामना करावा लागला. या भूकंपानंतर रशियातील कामचटकाला त्सुनामीचा तडाखा बसला आहे. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणनुसार, (U.S. Geological Survey) हा भूकंप जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा भूकंप होता. याआधी 4 नोव्हेंबर 1952 रोजी रशियामध्ये 9.0 रिश्टर स्केल एवढा मोठा भूकंप झाला होता. इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कामचटकाला 4 मीटर उंचीपर्यंतची त्सुनामी आली. त्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणने (USGS) सांगितले की, भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 19.3 किलोमीटर खोल होते.

कामचटकाचे राज्यपाल व्लादिमीर सोलोडोव्ह यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला. ते म्हणाले की, आजचा भूकंप दशकांमधील सर्वात शक्तिशाली होता. एका बालवाडी शाळेचे नुकसान झाले आहे. जपानच्या एका वृत्त चॅनलनुसार, देशाच्या पूर्व किनाऱ्याजवळ एक फूट उंचीच्या पहिल्या त्सुनामी लाटा आल्या आहेत. जपानने 20 लाख लोकांना बाहेर काढले आहे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तसेच, फुकुशिमा अणुभट्टीतील लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच, यावेळी गुआम आणि उत्तरी मारियाना बेटांना त्सुनामीचा इशारा अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान खात्याकडून देण्यात आला होता.

सोशल मीडियावर त्सुनामीशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जात आहेत. भूकंपानंतर किमान 4 व्हेल जपानच्या किनाऱ्यावर वाहून गेल्याचे वृत्त आहे. त्याच वेळी त्सुनामी इशारा जारी झाल्यानंतर, जपानमधील होक्काइडोमध्ये लोक छतावर चढले. अमेरिका आणि फिलीपिन्सच्या किनारी भागातही त्सुनामी इशारा जारी करण्यात आला. रशियाच्या सरकारने म्हटले की, उत्तर कुरिल जिल्ह्यात जिथे बुधवारी त्सुनामी आणि भूकंप आला. तिथे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. पूर्व रशियाच्या राज्यपालांनी लोकांना किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

जगातील सहावा सर्वात मोठा भूकंप

आतापर्यंत नोंदवलेल्या सहा सर्वात शक्तिशाली भूकंपांमध्ये अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणनुसार (USGS)याची गणना केली जाईल. याआधी त्याच तीव्रतेचे आणखी दोन मोठे भूकंप झाले होते. एक 2010 मध्ये चिलीच्या बायोबायो प्रदेशात आणि दुसरा 1906 मध्ये इक्वेडोरमधील एस्मेराल्डास येथे आला. यूएसजीएसने दिलेल्या माहितीनुसार, चिलीच्या भूकंपात 523 लोकांचा मृत्यू झाला आणि 3.7 लाखांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली. त्याचवेळी, 1500 लोकांचा मृत्यू इक्वेडोरच्या भूकंपामुळे आलेल्या मोठ्या त्सुनामीत झाला आणि लाटा अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत पोहोचल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img