25.9 C
New York

Prajakta Mali : प्राजक्ता माळीने केला क्रशचा खुलासा

Published:

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायम चर्चेत असते, कधी तिच्या कामामुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने तिच्या लव्ह लाईफविषयी काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. तिने स्पष्टपणे सांगितलं की तिचे दोन क्रश आहेत एक बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kappoor ) आणि दुसरा मराठी अभिनेता वैभव तत्त्ववादी (Vaibhav Tatwavadi)

प्राजक्ताचं पहिलं प्रेम म्हणजेच रणबीर कपूर (Ranbir kapoor). तिला रणबीरकडे पाहिलं की नेहमीच प्रेमात असल्यासारखं वाटतं, असं ती म्हणाली. रणबीरचं सोशल मीडियावर फारसं नसलं जाणं, त्याचं प्रायव्हेट लाईफ सांभाळणं, आणि अभिनयासाठी दिलेला दृष्टिकोन या गोष्टी तिला खूप भावतात.

दुसऱ्या क्रशबाबत तिने सांगितलं की, वैभव तत्त्ववादी तिला ‘कॉफी आणि बरंच काही’ हा सिनेमा पाहिल्यानंतर आवडायला लागला. इतकंच नाही, तर तिने आईलाही वैभवला जावई म्हणून स्वीकारायला सांगितलं होतं. मात्र सध्या दोघे चांगले मित्र आहेत, असंही प्राजक्ताने स्पष्ट केलं.

या सगळ्या गोष्टींवरून तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, तिचं प्रेमप्रकरण आणि नातेसंबंध यावर अधिक चर्चा होताना दिसत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img