फॅशनचे जग हे सतत बदलणारे असते. नव्या ट्रेंडसोबतच जुने स्टाईल्स पुन्हा नव्याने लोकप्रिय होताना दिसतात. सध्या एका हटके आणि बोल्ड फॅशनने तरुण पिढीला भुरळ घातली आहे – ती म्हणजे ‘बेली बटन फॅशन’, म्हणजेच नाभीला स्टाईलिश बनवण्याचा नवा ट्रेंड!
पूर्वी ९०च्या दशकात बॉलिवूडमधील करिश्मा कपूर, शिल्पा शेट्टी, रवीना टंडन यांसारख्या अभिनेत्री क्रॉप टॉप्स किंवा लो-वेस्ट साड्यांमधून नाभीला स्टाइल स्टेटमेंट बनवायच्या. पुढे हॉलिवूडमध्ये ब्रिटनी स्पीयर्ससारख्या पॉप स्टार्सनीही हा ट्रेंड ग्लोबल केला. आजच्या सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या इन्फ्लुएन्सर्सनी तर याला नव्या उंचीवर नेलं आहे.
आजच्या फॅशनमध्ये क्रॉप टॉप्स, ब्रालेट्स, ट्यूब टॉप्स आणि लो-वेस्ट जीन्स/स्कर्ट्स नाभीला फोकसमध्ये ठेवून डिझाइन केल्या जातात. हे कपडे केवळ ट्रेंडी वाटत नाहीत, तर स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रदर्शन करण्याचं माध्यमही ठरतात. नाभीत पियर्सिंग करून रिंग घालणे, टॅटू करून बॉडी आर्ट दाखवणे – ही सगळी स्टाईल आत्म-अभिव्यक्तीचा भाग बनली आहे.
आज इंस्टाग्राम रील्सपासून ते कॉलेज फेस्टपर्यंत नाभी फ्लॉन्ट करणं म्हणजेच बोल्ड आणि कॉन्फिडंट स्टाईलचं प्रतीक मानलं जातं.
पण स्टाइलसोबत काळजीही आवश्यक!
जर तुम्ही नाभीत पियर्सिंग करत असाल, तर योग्य स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे. अँटीसेप्टिकचा वापर, घट्ट कपड्यांपासून दूर राहणं आणि सुकून येईपर्यंत साचलेल्या पाण्यापासून नाभी वाचवणं – या गोष्टींचं विशेष लक्ष द्या.
नाभी पियर्सिंगचा खर्च किती?
भारतामध्ये नाभी पियर्सिंगसाठी सामान्यतः ₹2000 ते ₹7000 एवढा खर्च येतो. मेट्रो सिटीतील चांगल्या स्टुडिओमध्ये हा खर्च ₹2500 पासून सुरू होतो. मात्र, जर तुम्ही कमी बजेटमध्ये पार्लरकडे गेलात, तर ₹500-₹1000 मध्येही पियर्सिंग होऊ शकते. पण तेवढी स्वच्छता आणि सुरक्षितता तिथे मिळेलच, याची खात्री नसते. त्यामुळे सुरक्षित आणि विश्वासार्ह ठिकाणीच पियर्सिंग करणं जास्त योग्य ठरतं.
बेली बटन फॅशन तरुणींमध्ये प्रचंड लोकप्रिय
नाभी पियर्सिंग, रिंग्स आणि टॅटू म्हणजे आत्म-अभिव्यक्ती
सोशल मीडियावर नाभी फ्लॉन्ट करणं – नवा स्टाईल स्टेटमेंट
पियर्सिंग करताना स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी आवश्यक
खर्च ₹500 ते ₹7000 पर्यंत, पण दर्जा आणि स्वच्छतेनुसार फरक