अभिनेत्री ईशा कोप्पीकर (Isha Koppikar) ही तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे आजही चर्चेत असते. बॉलिवूडसोबतच तिनं दक्षिणात्य चित्रपटांमध्येही (South Movie) दमदार कामगिरी केली आहे. बऱ्याच काळानंतर एका मुलाखतीत ईशा कोप्पीकरनं 1998 साली प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रलेखा’ या चित्रपटाच्या सेटवरील एक धमाल अनुभव शेअर केला.
ईशानं सांगितलं की, त्या सिनेमात ती साऊथ सुपरस्टार नागार्जुनसोबत (Nagarjun) काम करत होती आणि एका सीनमध्ये तिला थोबाडीत मारण्याचं दृश्य होतं. त्या सीनला वास्तववादी बनवण्यासाठी ईशानं स्वतः नागार्जुनला तिला खरंच थोबाडीत मारायला सांगितलं! नागार्जुनने आधी आश्चर्य व्यक्त केलं, पण ईशाच्या आग्रहामुळे त्यानं तिला सीनसाठी तब्बल 14 थोबाडीत लगावल्या.
ईशा म्हणाली, “माझं तेव्हाचं अॅक्टिंगवर खूप प्रेम होतं. मला मेथड अॅक्टिंग करायची होती. म्हणून त्या थोबाडीत मला काही वाटतच नव्हतं. पण अखेर गाल सुजून वण उठले.” दिग्दर्शकही आश्चर्यचकित झाले होते.
या प्रसंगानंतर नागार्जुन खूपच नरमला आणि सतत “सॉरी” म्हणत होता. पण ईशानं त्याला थांबवत सांगितलं की, “हे सगळं मीच सांगितलं होतं, म्हणून मला सॉरी म्हणू नको.” हा किस्सा जितका मजेशीर आहे, तितकाच तो ईशाच्या अभिनयातील समर्पणाचंही उदाहरण आहे.