32.8 C
New York

Taarak mehta ka ooltah chashmah : दयाबेनची अनुपस्थिती जड जातेय जेठालालला?

Published:

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak mehta ka ooltah chashmah ) ही लोकप्रिय मालिका गेली अनेक वर्षं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही मालिका प्रिय आहे. मात्र गेल्या काही काळात मालिकेच्या टीममध्ये मोठे बदल झालेत. अनेक जुन्या चेहऱ्यांनी निरोप घेतल्यानं प्रेक्षकांची नाराजीही वाढली आहे. त्यातच दयाबेनची म्हणजेच दिशा वकानीची दीर्घ अनुपस्थिती अजूनही चर्चेचा विषय ठरत आहे.

दिशा वकानीने (Disha Vakani) डिलिव्हरीनंतर मालिकेतून विश्रांती घेतली आणि त्यानंतर ती परत कधी येणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. ती सध्या तिच्या कुटुंबाला वेळ देत असून, छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं नाही.

या सगळ्यात एक खूप भावनिक गोष्ट समोर आली आहे. मालिकेतील जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं की, दिशा म्हणजे दयाबेनला मिस करत आहेत. “2008 ते 2017 पर्यंत आम्ही एकत्र काम केलं. पहिल्याच दिवसापासून आमचं एक खास नातं तयार झालं. आम्ही थिएटरमध्ये एकत्र काम केल्यामुळे केमिस्ट्री जबरदस्त होती,” असं त्यांनी सांगितलं.

दिशाच्या अनुपस्थितीने केवळ प्रेक्षकच नाही, तर सहकलाकारही भावूक झाले आहेत. तिचा भाऊ मयूर वकानीने देखील असित मोदी यांचे आभार मानले आणि हे सांगितलं की, “लहानपणापासून मी बहिणीसोबत रंगमंचावर काम केलंय. मालिकेचा तो काळ आमच्यासाठी खास होता.” दिशाच्या पुनरागमनाविषयी अजूनही काही स्पष्ट झालेलं नाही, पण तिचं स्थान आणि चाहत्यांमधली तिची आठवण अजूनही तितकीच मजबूत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img