‘सैय्यारा’ (Saiyaara)हा चित्रपट अवघ्या 11 दिवसांत 250 कोटींचा टप्पा पार करत वर्षातील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टरपैकी एक ठरला आहे. या यशामागे केवळ चित्रपटाची कथा आणि संगीतच नव्हे, तर नवीन चेहऱ्यांची जादूही आहे. अहान पांडे आणि अनित पद्डा यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली.
मात्र हे दोघं मूळ कलाकार नव्हते. एका रिपोर्टनुसार, दिग्दर्शक मोहित सुरी (Mohit Suri) आणि निर्माते सुरुवातीला खऱ्या आयुष्यातील चर्चित जोडगोळी सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani)यांना साइन करायचा विचार करत होते. ‘शेरशाह’मधील त्यांच्या केमिस्ट्रीनंतर, त्यांच्यावर प्रेक्षकांचा भरोसा होता. परंतु वेळ आणि प्लॅनिंग न जुळल्यामुळे ते शक्य झालं नाही.
दिग्दर्शक मोहित सुरीने एका मुलाखतीत सांगितलं की, आदित्य चोप्रा (Aditya Chopra )यांनीच सल्ला दिला की ओळखीच्या चेहऱ्यांपेक्षा नवीन कलाकार घेणं अधिक प्रभावी ठरेल. “ही दोन नव्या तरुणांची गोष्ट आहे, ती फ्रेश दिसली पाहिजे,” असं आदित्यचं मत होतं. या सल्ल्यानंतर अहान आणि अनितची निवड झाली आणि ती निर्णय योग्य ठरला.
आज, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचत 250 कोटींचा आकडा पार केला असून, लवकरच 300 कोटींवर झेप घेण्याची शक्यता आहे. या यशामुळे नव्या कलाकारांसाठी नवे दरवाजे उघडले आहेत, आणि बॉलिवूडमध्ये फ्रेश टॅलेंटला एक नवं स्थान मिळालं आहे.