टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलची (Yujvendra Chahal) चर्चेत असलेली रुमर्ड गर्लफ्रेंड आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर RJ महवश हिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आणि त्यामुळे ती ट्रोलिंगच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने रिलेशनशिपमधील फसवणुकीबद्दल (cheating) मते मांडणारा व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये ती म्हणते की, गुपचूप मेसेज करणं, एक्ससोबत बोलणं, अश्लील कंटेंट पाहणं हे सगळं चिटिंगचं रूप आहे.
पण महवशचा हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी तिच्यावर निशाणा साधला आहे. काहींनी थेट आरोप केला की, तिने चहलला त्याच्या पत्नी धनश्रीपासून वेगळं केलं आणि हे सुद्धा फसवणूकच आहे. एक युजर म्हणतो, “दुसऱ्याचा नवरा चोरलं, हे चिटिंग नाही का?” यावर उत्तर देताना महवश म्हणाली, “मी नवरा चोरलेला नाही, त्यामुळे मला माहीत नाही… पण हो, ते चिटिंगच आहे.”
या ट्रोलिंगदरम्यान महवशने एक भावनिक संदेशही शेअर केला. ती म्हणाली की, “प्रेम ही फारच दुर्मीळ गोष्ट आहे, आणि प्रेमात फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना वेळेआधी ओळखलं पाहिजे. क्षमा देणं चांगलं, पण पुन्हा पुन्हा फसवून घेणं योग्य नाही.”