प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) सध्या त्याच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. अचूक विनोदासाठी ओळखला जाणारा कपिल आता आपल्या फिट आणि स्मार्ट लूकमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. अवघ्या 63 दिवसांत त्याने तब्बल 11 किलो वजन कमी केलं असून, हे करण्यासाठी त्याने ना विशेष डाएट फॉलो केलं, ना जिममध्ये तासनतास घाम गाळला.
फिटनेस ट्रेनर योगेश भटेचा, ज्यांनी फराह खान, सोनू सूद आणि कंगना राणौत यांना ट्रेन केलं आहे, त्यांनी कपिलच्या या बदलामागचं रहस्य उघड केलं. योगेश सांगतो की कपिलने ‘21-21-21’ पद्धतीचा अवलंब करून आपल्या सवयींमध्ये सुधारणा केली. सुरुवातीला त्याचं शरीर जड आणि सूज आलेलं होतं, स्ट्रेचिंगसुद्धा कठीण जात होतं. पण सातत्य, योग्य मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे हळूहळू त्याने सुधारणा केली.
योगेशने कपिलला सुरुवातीला घरच्या घरी ट्रेनिंग दिलं, जिथे रेझिस्टन्स बँड आणि योगा मॅट यासारखी सोपी साधनं वापरली गेली. नंतर हळूहळू जिमचाही वापर सुरू झाला. आहारामध्ये मासे आणि विविध भाज्यांचा समावेश करून प्रोटीन वाढवलं आणि कॅलोरी नियंत्रणात ठेवलं.
कपिलचं वेळापत्रक खूप व्यस्त असल्यामुळे झोप आणि जेवणाच्या वेळा अनियमित होत्या. हे सर्व गोष्टी सुधारण्यात थोडा वेळ लागला, पण अखेरीस त्याचं शरीरही साथ देऊ लागलं आणि एक नवीन, फिट कपिल सगळ्यांसमोर आला. आता चाहत्यांनाही त्याचा हा लूक खूपच आवडतोय.