32.8 C
New York

Ankita Prabhu Walawalkar : “महाराजांचं नाव गेटला पण पायथ्याशी कचरा! ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरचा संतप्त सवाल”

Published:

‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted girl) म्हणून सोशल मीडियावर ओळख निर्माण केलेली अंकिता प्रभू वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी तिच्या पोस्टमधून प्रेम नाही, तर प्रचंड संताप ओसंडून वाहतोय. कारण काय तर… नांदगावमधल्या छत्रपती शिवाजी महाराज गेटशेजारी साचलेला कचऱ्याचा ढीग!

एका व्हिडीओसह आणि जोरदार शब्दांमध्ये अंकिताने या परिस्थितीवर बोट ठेवलंय. ती म्हणते, “महाराजांचं नाव गेटला देऊन शेजारी असलेली घाण, प्लास्टिकच्या पिशव्या, थुंकी याकडे दुर्लक्षच का?”

ती पुढे विचारते, “जर आज शिवाजी महाराज खरंच या गेटमधून आले असते, तर आपण त्यांना या दृश्यातून चालू दिलं असतं का?” तिचा संताप केवळ प्रशासनावर नाही, तर प्रत्येक निष्काळजी नागरिकावर आहे.

काही जण तिला विचारतील, “तूच का नाही गेला कचरा उचलायला?” यावर अंकिताचं उत्तर स्पष्ट आहे “कचरा उचलण्याची वेळ न येणं ही जबाबदारी असावी! महाराजांच्या नावाने गेट आहे, तर त्या जागेचं पावित्र्य राखणं ही सगळींची सामूहिक जबाबदारी आहे.”

पुढे ती म्हणाली महाराजांचा अभिमान बोलण्यात नाही, तर कृतीत दिसला पाहिजे. रोज ‘शिवाजी महाराज जय’ म्हणताना जो अभिमान आपण दाखवतो, तो कचऱ्यातून न दिसता, स्वच्छतेतून दिसायला हवा.अनेक यूझर्सनीही तिच्या पोस्टला भरभरून पाठिंबा दिलाय. एकाने तर लिहिलं, “नावावरून भांडणं सोपंय, पण नाव राखणं ही खरी शिवभक्ती!

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img