बॉलिवूडमध्ये नवोदित अभिनेता अहान पांडे याने आपल्या पहिल्याच चित्रपटातून धमाका केला आहे. चंकी पांडे याचा पुतण्या असलेल्या अहानने ‘सैय्यारा’ या रोमँटिक ड्रामातून सिनेसृष्टीत प्रवेश केला असून, या चित्रपटाने अगदी दहा दिवसांतच एक जबरदस्त विक्रम उभारला आहे.
18 जुलैला प्रदर्शित झालेला ‘सैय्यारा’ हा चित्रपट शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ला बॉक्स ऑफिसवर मागे टाकत, नवा इतिहास रचताना दिसत आहे. Sacnilk च्या आकडेवारीनुसार, दहाव्या दिवशी 30 कोटींच्या घरात कमाई करत एकूण गल्ला 247.25 कोटींवर पोहोचला आहे. शाहरुखचा 2013 मधील ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा चित्रपट 227 कोटींवर थांबला होता. त्यामुळे आता अहानचा ‘सैय्यारा’ त्याही पुढे गेला आहे.
चित्रपटाच्या कमाईवर नजर टाकल्यास –
पहिला दिवस – 21 कोटी
दुसरा दिवस – 26 कोटी
तिसरा दिवस – 35.75 कोटी
चौथा दिवस – 24 कोटी
पाचवा दिवस – 25 कोटी
सहावा दिवस – 21.5 कोटी
सातवा दिवस – 19 कोटी
आठवा दिवस – 18 कोटी
नववा दिवस – 26.5 कोटी
एकूण आठवड्याचा गल्ला – 172.75 कोटी रुपये
दिग्दर्शक मोहित सुरी आणि निर्माता YRF यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. सोशल मीडियावर ‘सैय्यारा’चे गाणं, रील्स आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, प्रेक्षक त्याच्या कथा, रोमँटिक सीन आणि संगीतावर फिदा झालेत.
चित्रपटातील स्टारकास्ट, कथानक, आणि जबरदस्त मार्केटिंग यामुळे ‘सैय्यारा’ने प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली आहे. या यशामुळे अहान पांडे आता बॉलिवूडमध्ये ‘रोमॅन्सचा नवा राजा’ म्हणून पुढे येताना दिसतो आहे.