राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर (Heavy Rain) वाढल्याचे चित्र बघायला मिळाले. कालही सर्वदूरपर्यंत पाऊस होता. आज पावसाचा जोर ओसरताना दिसतोय. पावसाने मुंबई, पुणे, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, अकोला, वाशिम, यवतमाळ परिसरात हजेरी लावली. पाऊस मराठवाड्यातील काही भागांमध्ये म्हणावा तसा अजूनही झाला नसल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. भारतीय हवामान विभागाने काल अनेक भागांमध्ये येलो आणि ऑरेंज अलर्ट दिला होता.
Heavy Rain हवामान खात्याकडून ऑरेंज आणि येलो अलर्ट
काही भागांमध्ये आज देखील हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला. कोकण, विदर्भामध्ये आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. अनेक शहरांमधील रस्त्यावर काल झालेल्या पावसामुळे पाणी साचले. रविवारी सकाळीच पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळाले आणि साधारपणे कमी जास्त करत 24 तास पाऊस अनेक भागांमध्ये होता.
Heavy Rain पुण्यातील धरण क्षेत्रात जोरदार पावसाची हजेरी
भारतीय हवामान खात्याकडून कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा देण्यात आला. पुणे विभागातील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे. जोरदार पाऊस कोकणातील काही भागांमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.पाऊस मुंबई आणि पुण्यातही हजेरी लावण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला नाहीये.
Heavy Rain काही भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतिक्षा कायम
पुढील दोन दिवसात हवामानात फारसा बदल होणार नसल्याने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. घाट विभागात मात्र पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसाने काही ठिकाणी पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
Heavy Rain भारतीय हवामान खात्याकडून महत्वाचा इशारा
दरवर्षीपेक्षा यावेळी राज्यात मॉन्सून लवकरच दाखल झाला. वातावरणात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस सुरू आहे. फक्त राज्यच नाही तर देशातील अनेक भागांमध्ये दमदार पाऊस सुरू असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. राज्यात यंदा पाऊस चांगला राहण्याची शक्यता देखील आहे.
Heavy Rain घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस
ताम्हिणी घाट परिसरात 280 मिमी नोंद झालीये. सलग तिसऱ्या दिवशी पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घटमाथ्यावर मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला. गेल्या 24 तासात ताम्हीणी घाट परिसरात सर्वाधिक 280 मिमी पावसाची नोंद झालीय, तर दावडी येथे 223 मिमी पाऊस झालाय.