33 C
New York

Hair Care Tips : जवसाच्या जेलने करा केसांचं नैसर्गिक बोटॉक्स!

Published:

कधी कधी केसांची योग्य निगा राखणं अवघड वाटतं, पण घरात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींचा योग्य वापर केल्यास केसांसाठी महागड्या ट्रीटमेंट्सची गरजच भासत नाही. पोषणतज्ञ किरण कुकरेजा यांच्यामते, अळशी म्हणजेच जवसाच्या बियांपासून तयार होणाऱ्या जेलचा वापर केल्यास केसांची वाढ, मऊपणा आणि चमक आश्चर्यकारकरित्या वाढते — अगदी सलूनमध्ये केलेल्या बोटॉक्ससारखा अनुभव देतो!

कसं बनवाल नैसर्गिक हेअर जेल?

२ कप पाण्यात २ चमचे अळशीच्या बिया टाका.

हे मिश्रण मंद आचेवर गरम करा. काही वेळात ते जेलसारखं दाट होईल.

ते चाळणी किंवा स्वच्छ कापडातून गाळून घ्या.

हवे असल्यास त्यात ४-५ थेंब रोझमेरी इसेन्शियल ऑइल घालू शकता.

कसं वापरायचं?

हे जेल केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा. एक ते दीड तास राहू द्या आणि नंतर सौम्य शॅम्पूनं धुवा. आठवड्यातून १-२ वेळा वापरल्यास केस मऊ, लवचिक आणि चमकदार होतील.

जवसाचं केसांवर काय प्रभाव पडतो?

ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडमुळे टाळूतील जळजळ कमी होते.

व्हिटॅमिन ई केसांना मजबूती आणि नैसर्गिक चमक देतो.

लिग्नान्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स केसांचं नुकसान रोखतात.

प्रथिने आणि खनिजांनी केसांची गुणवत्ता वाढते.

अजून काही केसांसाठी खास टिप्स:

नियमितपणे कोमट पाण्यानं केस धुवा.

तेलाने हलका मसाज करा.

केस नैसर्गिक पद्धतीने सुकवा.

स्ट्रेटनर, ड्रायरचा अति वापर टाळा.

केसांच्या टोकांचं ट्रिमिंग करा.

योग, ध्यान यामुळे तणाव कमी करणेही केसांच्या आरोग्यास उपयुक्त ठरतं.

झोप पूर्ण घ्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img