22.6 C
New York

Barabanki temple : पहिल्याचं श्रावणी सोमवारी दुर्घटना! बाराबंकी शिवमंदिरात चेंगराचेंगरी दोघांचा मृत्यू

Published:

उत्तराखंडमधील हरिद्वार येथील (Haridwar) प्रसिद्ध मनसा देवी मंदिरात रविवारी सकाळी प्रचंड गर्दी जमल्यामुळे चेंगराचेंगरी झाली होती. उत्तर प्रदेशाच्या बाराबंकी (Barabanki temple) शिवमंदिरात ही घटना ताजी असतानाच आता पहिल्याचं श्रावणी सोमवारी चेंगराचेंगरी झाली आहे. टीनच्या पत्राशेडवर विजेची तार पडल्याने ही दुर्घटना घडली आहे.

दुर्देवाने या घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 18 हून अधिक जण तसेच जखमी झाले आहेत. त्यात 5 जणांची प्रकृती जखमी असलेल्या विजेचा धक्का बसल्याने गंभीर आहे. या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. ही दुर्घटना त्यानुसार ही विजेची तार माकडांनी तोडल्यामुळे घडली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर संवेदना व्यक्त केल्या. अधिकाऱ्यांना तात्काळ या पिडीत कुटुंबांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच योग्य उपचार तात्काळ देण्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान या अगोदर उत्तराखंडमधील हरिद्वार येथील (Haridwar) प्रसिद्ध मनसा देवी मंदिरात रविवारी सकाळी प्रचंड गर्दी जमल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला (Mansa Devi Temple Stampede) आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रशासनाचे म्हणणे आहे की, मंदिराच्या मुख्य रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय पथके घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी (Haridwar Mansa Devi Temple Stampede) पोहोचली. मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री धामी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं होतं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img