‘साथ निभाना साथिया’ (Saath Nibhana Sathiyan) मालिकेतील प्रसिद्ध गोपी बहु देवोलीना भट्टाचार्जी हिने 14 डिसेंबर 2022 रोजी तिच्या जिम ट्रेनर शाहनवाज शेखशी (ShajanSheikh) आंतरधर्मीय विवाह केला. लग्नाच्या वेळी धर्मामुळे बराच वाद निर्माण झाला होता, आणि सोशल मीडियावर अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. मात्र देवोलीनाने कोणत्याही टीकेचा फारसा परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ दिला नाही आणि अनेकदा सोशल मीडियावर स्पष्ट आणि ठाम उत्तरंही दिली.
देवोलीनाने 18 डिसेंबर 2024 रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला. ती आपल्या पती आणि मुलासोबतचे क्षण इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नुकतेच पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये तिच्या मुलाचा चेहरा पहायला मिळाल्याने काही नेटकऱ्यांनी अत्यंत अशोभनीय आणि रंगभेदी टिप्पणी केली. “किती काळा दिसतोय!” किंवा “गोर्या माणसाशी लग्न केलं असतं, तर मूलही गोऱं झालं असतं” अशा मर्यादा ओलांडणाऱ्या टीका केल्या गेल्या. या नकारात्मक प्रतिक्रियांना देवोलीनाने दुर्लक्ष करत आपल्या कुटुंबाचा आनंद सोशल मीडियावर शेअर करणे थांबवलेले नाही.
शाहनवाजनेही एक मुलाखतीत त्यांच्या प्रेमकथेचा उल्लेख करत सांगितले होते की, पहिल्या लॉकडाऊनमध्ये त्यांची ओळख झाली आणि धर्मामुळे काही अडचणी आल्या, पण दोघांनी एकमेकांना समजावत निर्णय घेतला. देवोलीनानेही मान्य केलं होतं की तिच्या कुटुंबात लग्नास विरोध होता. फक्त तिची मावशी आणि मोठे काका यांनी पाठिंबा दिला होता, तर आई सुरुवातीला लग्नासाठी तयार नव्हती, पण शेवटी तिचं मन बदललं.