आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत. चुकीच्या खाण्यापिण्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि त्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो. यावर उपाय म्हणून रोजच्या दिनक्रमात “बॉडी डिटॉक्सिंग”चा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे.
बॉडी डिटॉक्स म्हणजेच शरीरात साचलेले विषारी घटक आणि अशुद्धता बाहेर टाकून शरीराला आतून शुद्ध करणं. यासाठी कोणतंही महागडं टॉनिक किंवा औषध लागत नाही, तर आपल्या स्वयंपाकघरातीलच काही घरगुती घटक वापरून तयार करता येणाऱ्या डिटॉक्स ड्रिंकचा उपयोग होतो.
हे घरगुती डिटॉक्स ड्रिंक कसं तयार करायचं?
तुम्हाला लागतील जिरे, धणे, मेथीचे दाणे आणि बडीशेप (एका खास प्रकारची). हे सगळे घटक संध्याकाळी कोमट पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून घ्या आणि चहासारखं हळूहळू प्या.
या ड्रिंकमध्ये असलेल्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे शरीरातली सूज, अॅसिडिटी, गॅस आणि पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. हे सातत्याने प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते आणि त्वचाही उजळते. ऑफिसमध्येही तुम्ही हे पाणी छोटी बाटलीत ठेवून दिवसातून २-३ वेळा घेऊ शकता.
थोडक्यात फायदे:
शरीर डिटॉक्स होते, पचनशक्ती सुधारते, अॅसिडिटी कमी होते, त्वचा चमकते, वजन नियंत्रणात येते. दररोज सकाळी पिऊन बघा आरोग्यदायी बदल तुम्हाला जाणवतीलच!