22.2 C
New York

Raj – Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर

Published:

शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 65वा वाढदिवस आहे. (Raj – Uddhav Thackeray) यानिमित्ताने त्यांचे चुलत बंधू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांची मातोश्री येथे येऊन भेट घेतली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जवळपास 20-25 मिनिटे राज ठाकरे हे मातोश्री येथे होते. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मातोश्रीच्या गेटपर्यंत यावेळी शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत हे गेले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील यावेळी उपस्थित होते. जवळपास 20 वर्षानंतर राज ठाकरे हे उद्धव यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री येथे आले. याआधी 5 जुलै रोजी मराठी विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले. एकाच महिन्यात दोन्ही भावांची ही दुसरी भेट आहे.

Raj – Uddhav Thackeray मला खुप आनंद – उद्धव ठाकरे

राज ठाकरे यांनी मातोश्री येथे येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांचे अभिष्ठचिंतन केले, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी आज मला खुप आनंद झाला अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्यानंतर मातोश्रीमध्ये दोन्ही भावांमध्ये साधारण 20 मिनिटं चर्चा झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर त्यांनी फोटो काढला. दोन्ही भावांमधील भेटी वाढत आहेत, त्यांचे मनोमिलन होत आहे. याबद्दल शिवसैनिकांनी देखली आनंद व्यक्त केला आहे.

Raj – Uddhav Thackeray ज्युनिअर ठाकरे एकत्र येणार

सिनिअर ठाकरे बंधू आज सकाळी एकत्र आले आहेत. त्यानंतर ज्युनिअर ठाकरे बंधू अर्थात आमदार आदित्य उद्धव ठाकरे आणि अमित राज ठाकरे हे आज संध्याकाळी एकत्र येणार असल्याची माहिती आहे. आदित्य आणि अमित ठाकरे वरळी येथील पोलीस वसाहत येथील बाप्पाच्या पाद्यपुजन कार्यक्रमात एकत्र येणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img