21.5 C
New York

Uddhav-Raj Thackeray : राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना, भावाची घेणार भेट

Published:

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या (Uddhav-Raj Thackeray) युतीवर चर्चा सुरु आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठं पाऊल उचललं आहे. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने राज ठाकरे हे मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. मातोश्रीच्या दिशेने राज ठाकरे हे शिवतीर्थ या निवासस्थानावरुन रवाना झाले आहेत. त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष या भेटीकडे लागले आहे.

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. मातोश्रीबाहेर फुलांनी सजावट करण्यात आली असून ठिकठिकाणी बॅनरबाजीही पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यभरातून हजारो शिवसैनिक हे मुंबईत दाखल झाले आहेत. सध्या अनेक शिवसैनिकांनी मुंबईतील त्यांच्या मातोश्री निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे. मुंबईसह राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img