भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या कसोटी क्रिकेटमधून (Kapil Dev on Bumrah Retirement) निवृत्तीच्या चर्चेला आता नवा वळण मिळालं आहे. माजी कर्णधार कपिल देव यांनी या विषयावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. मोहम्मद कैफने बुमराहचा वेग कमी झाल्याचं निरीक्षण नोंदवत, त्याच्या निवृत्तीचा इशारा दिला होता. त्यावर आता कपिल देव यांनी थेट मत दिलं आहे.
कपिल देव म्हणाले की, काळ बदलतो तसे खेळाडूंचं शरीर आणि खेळाची शैलीही बदलते. “आम्हाला सुरुवातीला कधी वाटलंच नव्हतं की बुमराह इतकं लांब खेळेल. तो शरीरावर खूप ताण घेतो. त्यामुळे त्याचं लांब करिअर थोडं आश्चर्यकारक वाटतं,” असंही ते म्हणाले.
पुढे ते म्हणतात, “एक प्रेक्षक म्हणून मला वाटतं बुमराहनं अजून खेळावं. पण शेवटी प्रत्येकाला एक दिवस निरोप घ्यावाच लागतो.”
कपिल देव यांच्या या वक्तव्यानं बुमराहसमोरील निवड विकल्पांचा विचार पुन्हा चर्चेत आला आहे. कसोटी क्रिकेटमधील ताणतणाव, दुखापतींचा धोका आणि बुमराहसारख्या बॉलरवर होणारा भार, या सगळ्याचा विचार करूनच तो निर्णय घेईल, असं संकेत मिळत आहेत.