27.7 C
New York

Manikrao Kokate : सोमवारी माणिकराव कोकाटे राजीनामा देणार?

Published:

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा पावसाळी अधिवेशनात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या. तर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी राजीनामा द्या, अशी मागणी अनेक राजकीय विरोधी नेते करू लागले. पत्रकार परिषद घेऊन त्यावर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा देण्यासारखं मी केलाय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला असता. पुन्हा एकदा त्यांनी सरकारविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे भेटले. दरम्यान, त्यांनी माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही मंगळवारी आंदोलन करू, असे सांगितले. शिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मित्रपक्षांच्या आमदारांना समज देण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांना दिले आहेत.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे या सर्व पार्श्वभूमीवर येत्या सोमवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे, जवळपास त्यांचा राजीनामा निश्चित झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास २५ मिनिटं चर्चा झाली, ही चर्चा वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भात होती, अशी माहिती समोर येत आहे, मात्र या चर्चेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे. मात्र, फडणवीस यांचा दिल्ली दौरा हा वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तर दुसरीकडे सूरज चव्हाण यांना पुन्हा पक्षात घेणार नसल्याचंही अजित पवार यांनी विजय घाडगे यांना सांगितले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे हे सोमवारी राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.
माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा व्हावा, यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या विजय घाडगे यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता, या प्रकरणात सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img