29 C
New York

Supriya Sule : सुप्रिया सुळेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार, काय आहे कारण ?

Published:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या प्रचंड नाराज आहेत. राज्यातील मित्रपक्षांवर ते नाराज आहेत. महाराष्ट्राची सध्या देशामध्ये जी वाईट प्रतिमा समोर येत आहे त्याबद्दल ते अस्वस्थ आहेत. सरकारमधील मंत्री, आमदारांचा गलिच्छ कारभार समोर येत आहे, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी थोडीतरी संवेदना व्यक्त केली. सहकारी पक्षांबद्दल नाराजी जाहीर केली. उशिरा का होईना त्यांनी मी अस्वस्थ असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीची त्यांनी दिल्लीतील हायकमांडला माहिती देत नाराजी व्यक्त केली. सध्या जे की सुरु आहे ते अस्वस्थ करणारं असल्याचं ते म्हणाले, याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानते, अशी उपरोधिक टीका सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली.मुंबईतील रेस्टॉरंट्स

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या आज पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या. त्या माध्यमांसोबत आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या दृष्टीने आयोजित पक्षाच्या बैठकीनंतर बोलत होत्या. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यानिमित्ताने दिल्लीमध्ये महाराष्ट्राबद्दल काय चर्चा होत आहे, याचीही माहिती खासदार सुळेंनी यावेळी दिली.

Supriya Sule महाराष्ट्राबद्दल दिल्लीत काय चर्चा?

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राची एक मलिन प्रतिमा दिल्लीसमोर आली आहे. देशातील सर्वपक्षीय खासदार आम्हाला विचारत आहेत की, सभागृहात पत्ते खेळणारे हे कोण आहेत? आसपास पैशांच्या बॅगा पडलेल्या आहेत, हे कोण मंत्री आहेत? महाराष्ट्राची वाईट अवस्था झाली असल्याचे चित्र सध्या देशासमोर आहे. कंत्राटदारांची बीलं थकलेली आहेत. सांगली येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांनी का आत्महत्या केली, असेही एका खासदाराने विचारल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule मुख्यमंत्री फडणवीसांचे मानले आभार

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या नाराज आहेत. राज्यातील मित्र पक्षांबद्दल ते प्रचंड नाराज आहेत, अशी दिल्लीमध्ये चर्चा आहे. महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल अशी सध्याची परिस्थिती आहे. सराकारमधील मंत्र्यांचा, आमदारांचा जो गलिच्छ कारभार सुरु आहे, त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी थोडीतरी संवेदना दाखवली. मुख्यमंत्र्यांनी सहकारी पक्षांवर नाराजी व्यक्त केली. उशिरा का होईना ते म्हणाले, मी अस्वस्थ आहे. ते दिल्लीतील त्यांच्या हायकमांडच्या भेटीला गेले. हायकमांडला त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीबद्दल माहिती दिली आणि मी नाराज आहे. महाराष्ट्रात जे सुरु आहे ते वाईट होत आहे, असं त्यांनी सांगितलं. याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते. महाराष्ट्रात त्यांनी मान्य केलं की जे काही सुरु आहे तो गलिच्छ कारभार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img