25.2 C
New York

Makeup Tips : “फाउंडेशन की कंसीलर आधी लावायचं? मेकअप तज्ज्ञांचा सल्ला आणि परिपूर्ण लुकसाठी खास टिप्स”

Published:

मेकअपसाठी लाखोंची प्रॉडक्ट्स वापरली, तरी त्याचा परिणाम हवं तसा दिसत नाही, कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित केला जातो – मेकअपचा योग्य क्रम! अनेक महिलांना नेहमीच हा प्रश्न सतावतो की, आधी फाउंडेशन लावावं का कंसीलर? याच छोट्याशा निर्णयावर तुमचा संपूर्ण लुक अवलंबून असतो – कारण बरोबर क्रम पाळल्यास मेकअप नैसर्गिक आणि दीर्घकाळ टिकणारा होतो.

ब्युटी तज्ज्ञ आणि मेकअप आर्टिस्ट्सचं मत एकदम स्पष्ट आहे – नेहमी आधी फाउंडेशन आणि मग कंसीलर वापरावा. कारण फाउंडेशन हा तुमच्या चेहऱ्याचा बेस तयार करतो, स्किन टोन एकसंध करतो आणि डाग, डार्क सर्कल्ससारख्या त्रुटी अंशतः झाकतो. यामुळे नंतर फक्त गरजेच्या भागांवर कंसीलरचा वापर करता येतो, आणि संपूर्ण मेकअप जड वाटत नाही.

जर कंसीलर आधी लावलात, तर नंतरचा फाउंडेशनचा थर कंसीलरला हलकं करतो किंवा त्याची कव्हरेज कमी होते. त्यामुळे स्पॉट्स, रेडनेस किंवा डार्क सर्कल्स नीट झाकले जात नाहीत.

Makeup Tips त्वचेच्या प्रकारानुसार मेकअप कसा कराल?

कोरड्या त्वचेसाठी: आधी मॉइश्चरायझिंग प्रायमर, मग लिक्विड फाउंडेशन आणि शेवटी हायड्रेटिंग कंसीलर.

तेलकट त्वचेसाठी: मॅट फिनिश देणारा फाउंडेशन आणि मॅट कंसीलर वापरणं उपयुक्त.

मिश्र त्वचेसाठी: बेस टोन समजून घेत एकसंध फाउंडेशन लावणं महत्त्वाचं आहे.

कंसीलर निवडताना लक्षात घ्या:

डार्क सर्कल्ससाठी – पिच किंवा पिंक अंडरटोन.

स्पॉट्ससाठी – येलो अंडरटोन.

चेहऱ्यावरील लालसरपणासाठी – ग्रीन अंडरटोन.

फाउंडेशन आणि कंसीलर लिक्विड स्वरूपात असतील, तर डॅम्प ब्यूटी ब्लेंडर वापरावा – यामुळे प्रॉडक्ट त्वचेत छान मिक्स होतं आणि लुक नैसर्गिक राहतो. शेवटी, ट्रान्सलूसेंट सेटिंग पावडर आणि मेकअप सेटिंग स्प्रेने लुक लॉक करावा, जेणेकरून तो दिवसभर टिकेल.

फाउंडेशन आणि कंसीलरच्या योग्य क्रमाने वापरामुळे तुमचा लुक सहज, गडद न वाटता फ्लॉलेस आणि ग्लोइंग दिसतो. त्यामुळे पुढच्या वेळेस मेकअप करताना हे सोप्पं पण परिणामकारक सूत्र नक्की लक्षात ठेवा – “फर्स्ट फाउंडेशन, नंतर कंसीलर!”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img