16.2 C
New York

Kalyan Crime : रमीच्या नशेत चोरीचा गेम! धावत्या ट्रेनमधील महिलांचे दागिने लांबविले…

Published:

कल्याण-कसारा लोकल मार्गावर ऑनलाईन जुगाराचं (Online Rummy) व्यसन किती भयावह वळण घेऊ शकतं. याचा प्रत्यय घडलेल्या एका थरारक घटनेतून आला आहे. ऑनलाईन रमी खेळण्याच्या नादात आर्थिक कोंडीत सापडलेल्या एका तरुणाने आपल्या अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी चोरीचा मार्ग (Train Robbery) अवलंबला. विशेष म्हणजे, हा तरुण चक्क धावत्या लोकलमध्ये महिलांचे दागिने हिसकावत होता. अखेर, पोलिसांनी शर्थीने तपास करून या धाडसी चोरट्याला गजाआड केलं आहे.

ऋषिकेश बेनके (वय 35) गिरफ्तार करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो खर्डी येथे राहणारा आहे. तो स्थानिक पातळीवर रसवंती गृह चालवत होता. मात्र, पावसाळ्यामुळे दुकान बंद झाल्यानंतर त्याचं उत्पन्न (Kalyan Crime News) थांबलं. त्याच दरम्यान त्याला ऑनलाईन रमी खेळण्याचे व्यसन लागलं. जुगारात मोठ्या प्रमाणावर पैसे गमावल्यामुळे तो प्रचंड कर्जबाजारी झाला. या तणावातून मार्ग काढण्यासाठी त्याने चक्क रेल्वेमधील प्रवाशांवर हात साफ करण्याचा मार्ग निवडला.

Kalyan Crime नेमकं काय घडलं?

गेल्या काही आठवड्यांपासून कल्याण ते कसारा रेल्वेमार्गावर महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावले जात असल्याच्या तक्रारी रेल्वे पोलिसांकडे मोठ्या प्रमाणावर येत होत्या. विशेषतः खर्डी आणि कसारा स्टेशनदरम्यान या घटना घडत होत्या. चोरटा महिलांच्या बाजूला बसून योग्य क्षणाची वाट पाहत असे. ट्रेन थांबल्यावर क्षणार्धात दागिने हिसकावून तो उलट्या दिशेने धावत्या ट्रेनमधून उडी मारून फरार होत असे. त्याच्या या युक्तीमुळे पोलिसांना त्याचा माग काढणं, मोठं आव्हान बनलं होतं. मात्र, कल्याण जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या नेतृत्वाखाली दोन तपास पथकं नेमण्यात आली. तपासाला वेग आला.

Kalyan Crime सीसीटीव्ही फुटेजने दिला धागा

तपासादरम्यान रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली. यामध्ये एका ठिकाणी चोरटा ट्रेनमधून उडी मारून पळताना स्पष्ट दिसून आला. यावरून आणि मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित खर्डी परिसरातील असल्याचे पोलिसांना लक्षात आले. पोलिस पथकाने तत्काळ खर्डीला धाव घेतली. फुटेजमधील चेहरा ऋषिकेश बेनकेच असल्याची खात्री करून त्याला अटक केली.

अटकेनंतर झालेल्या चौकशीत ऋषिकेशने धक्कादायक खुलासे केले. त्याने सांगितले की, उत्पन्नाचा स्रोत दुकान बंद झाल्यामुळे बंद झाला. ऑनलाईन जुगारात पैसे घालवून तो आर्थिक विवंचनेत सापडला. कर्ज फेडणं आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याची चिंता त्याच्यावर होती. या नैराश्यातूनच त्याने चोरीचा मार्ग निवडल्याचं कबूल केलं. तो महिलांजवळ बसून त्यांच्या हालचाली हेरायचा आणि योग्य क्षणी दागिने हिसकावून धावत्या ट्रेनमधून उडी मारून पलायन करायचा. अनेक चोरीच्या घटना या पद्धतीने त्याने केल्याचं उघड झालं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img