25.2 C
New York

Heavy Rain : राज्यात पावसाचा हाहाकार! नदी-नाल्यांना पूर

Published:

सध्या महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. (Heavy Rain) यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यासोबत सातत्याने पाऊस मुंबईतही काल रात्रीपासून कोसळत आहे. हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट मुंबईसाठी जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिवसभर वर्तवली आहे. तर, रायगड आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. तर, रायगड आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, जुईनगर, बेलापूर आणि वाशी परिसरात पाऊस कोसळत आहे. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची पावसामुळे तारांबळ उडाली असली तरी, सध्या मुंबईतील वाहतूक व्यवस्था आणि लोकल ट्रेन सेवा सुरळीत सुरू आहेत.

तसेच कल्याण ते बदलापूर या परिसरात काल रात्रीपासूनच संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे. आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. तर अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे. सकल भागातील रस्त्यावर पावसाचा जोर कायम राहिला तर पाणी साठण्याची शक्यता आहे.

Heavy Rain आज समुद्राला मोठी भरती

भरती-ओहोटीच्या वेळापत्रकानुसार मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या , समुद्राला मोठी भरती २४ ते २७ जुलै या कालावधीत येणार आहे. समुद्रात ४.६६ मीटर उंचीच्या लाटाआज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी उसळणार आहेत. तर सर्वात मोठी म्हणजे ४.६७ मीटर उंचीच्या लाटा उद्या २६ जुलै रोजी येण्याची शक्यता आहे. महानगरपालिका प्रशासनाने या काळात नागरिकांना समुद्रकिनारी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img