मुंबई लोकल ब्लास्ट (Mumbai Blast Case) 12 आरोपींच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. मुंबई हायकोर्टाने 2006 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील बारा आरोपींना निर्दोष दिला होता. या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील ट्विट करत आपलं मत मांडला आहे.
Ajit Pawar अजित पवार म्हणतात…
२००६ मधील मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या सुटकेबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा सन्मान करतो आणि त्याचे स्वागत करतो.
सरकारकडून आम्ही हे निश्चित करू की या प्रकरणाची फेरचौकशी होईल, जेणेकरून याआधी तपासात जर काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्या दूर करता येतील.
मुंबईतील त्या दुर्दैवी स्फोटांमध्ये ज्यांनी आपले आप्तस्वकीय गमावले, त्यांना न्याय मिळावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि दुसरीकडे, जर या प्रकरणात कोणी निरपराध व्यक्ती अडकली असेल, तर त्यालाही योग्य ती मदत आणि दिलासा मिळायला हवा, हीच आमची भूमिका आहे.
Ajit Pawar अकराजण तुरूंगाबाहेरच राहणार
2006 मुंबई लोकल ब्लास्ट प्रकरणात सुप्रीम कोर्टाने बॉम्बे हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. स्थगिती दिली असली, तर निर्दोष मुक्तता दिलेले जे अकरा जण सध्या तुरूंगाबाहेर आहेत. त्यांना परत तुरूंगात जावं लागणार नाही. फक्त निर्णयाला स्थगिती दिली. महाराष्ट्र सरकारच्या वतीने अपिअर झालेले तुषार मेहता यांचं म्हणणं होतं की, हे निरीक्षण दुसऱ्या मकोका केसमध्ये वापरलं जाईल. त्यामुळे याला तुम्ही स्थगिती द्या. एवढ्यापुरती या निर्णयावर स्थगिती मिळालेली आहे. ते अकरा आरोपी तुरूंगाच्या बाहेरच राहणार आहेत. त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टासमोर त्यांना त्यांचं म्हणणं मांडावं लागेल. एक-दोन महिन्यात यावी नवी तारीख येईल. तुर्तास या निर्णयाला स्थगिती मिळालेली आहे, असं सुप्रीम कोर्टाचे कायदेतज्ज्ञ सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटलं आहे.