31.3 C
New York

Salman khan Bigg Boss 19 : ‘बिग बॉस 19’मध्ये भक्कम बदल! सलमान एकटा नाही तर ३ होस्ट असणार?

Published:

सलमान खानचा वादग्रस्त आणि लोकप्रिय शो ‘बिग बॉस 19’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि यंदाचा सीझन काहीसा वेगळा, हटके आणि चक्क धक्कादायक ठरणार आहे. यंदा शो केवळ टीव्हीवरच नाही, तर JioCinema आणि JioTV वरही स्ट्रीम होणार असल्याची माहिती आहे. अजूनही शोची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, पण 28 ऑगस्टपासून सलमान खानचा भाग शूट होणार असून 29 ऑगस्टला स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस शूट होतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळते.

या नव्या पर्वात सर्वात पहिला आणि मोठा बदल म्हणजे शोमधील प्रसिद्ध डायलॉग – “बिग बॉस चाहते हैं…” हा पूर्णपणे हटवण्यात येणार असून, त्याऐवजी आता “बिग बॉस जानता चाहते हैं…” हा नवा डायलॉग ऐकायला मिळणार आहे. म्हणजेच बिग बॉसचा टोन आणि संवादशैली आता अधिक प्रश्नार्थक आणि गुंतवून ठेवणारी असणार आहे.

दोन वेगळ्या थीम्स ही या वर्षीची खासियत असणार आहे. एक थीम राजकीय असून, ती देशातील सद्यस्थितीवर आधारित असेल, तर दुसरी थीम रिबाउंड म्हणजे जुने स्पर्धक किंवा चर्चेत असलेले सेलेब्रिटी पुन्हा मैदानात उतरतील. या थीम्सनुसारच स्पर्धकांची निवड होत असून, इंडियाज गॉट टॅलेंटमधील वादामुळे चर्चेत आलेल्या अपूर्वा मुखिजा यांना संपर्क करण्यात आला आहे.

शोचा सेट 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल आणि यंदा बिग बॉसचे एक नाही, दोन नाही तर तीन होस्ट असतील – सलमान खानसोबत करण जोहर, फराह खान आणि अनिल कपूर हे दिग्गज ही जबाबदारी सांभाळतील. म्हणजेच, प्रत्येक आठवड्यात विविध होस्ट्सकडून प्रेक्षकांना वेगळा अनुभव मिळणार आहे.

याशिवाय, घरातील कामकाजाबाबतही मोठा बदल करण्यात आला आहे. घरातील कामांची जबाबदारी स्पर्धकांवर सोपवण्यात आली असून बिग बॉस त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही. कोणतं रेशन आणायचं, कोणतं काम कोण करणार – हे सर्व निर्णय स्पर्धकच घेतील. यामुळे घरातली राजकारणं, दोस्ती-शत्रुत्व आणि रणनीती अधिक उग्र रूप घेण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img