31 C
New York

Mumbai High Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! ‘या’ दिवशी समुद्राला भरती येणार

Published:

सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस (Mumbai High Alert) कोसळत आहे. मुंबई शहर आणि कोकण किनारपट्टीला सध्या मुसळधार पावसाने झोडपले आहे. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही गावांचा संपर्क तुटला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळेल, असा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच समुद्राला मोठी भरती येत्या २४ ते २७ जुलै २०२५ दरम्यान येणार असल्याने नागरिकांना मुंबई महानगरपालिकेने समुद्राजवळ न जाण्याचे आवाहन केले आहे.

Mumbai High Alert समुद्राला मोठी भरती

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, २४ जुलै २०२५ ते रविवार, २७ जुलै २०२५ या कालावधीत सलग चार दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. समुद्रात उंच लाटा या काळात उसळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच दुपारी १.२० वाजता समुद्रात सर्वाधिक ४.६७ मीटर उंचीची लाट २६ जुलै २०२५ रोजीउसळण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, अशी सूचना महापालिकेने दिली आहे.

Mumbai High Alert भरतीची वेळ काय?

सकाळी ११.५७ वाजता – ४.५७ मीटर, गुरुवार, २४ जुलै २०२५
दुपारी १२.४० वाजता – ४.६६ मीटर, शुक्रवार, २५ जुलै २०२५
दुपारी ०१.२० वाजता – ४.६७ मीटर, शनिवार, २६ जुलै २०२५
दुपारी ०१.५६ वाजता – ४.६० मीटर, रविवार, २७ जुलै २०२५

भरतीच्या काळात नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये. तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. दरम्यान राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. वाहतूक कोंडी, जलभराव आणि सार्वजनिक सेवा यामुळे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img