हर्षल पाटील या 35 वर्षीय कंत्राटदाराने (Harshal Patil End Life) सांगली (Sangli) जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातीलआत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली. हर्षल यांनी जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे काम पूर्ण करूनही शासनाकडून थकीत देयके मिळाली नाहीत. शेतामध्ये (Jayant Patil Video Viral) आर्थिक विवंचनेतून त्यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. विशेष म्हणजे, या आत्महत्येच्या काही दिवस आधीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते जयंतराव पाटील यांनी विधानसभेत यासंदर्भात स्पष्ट इशारा दिला होता.
Jayant Patil जयंतराव पाटील यांचा व्हिडीओ व्हायरल
पावसाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत जयंतराव पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला होता. कंत्राटदारांची बिले अनेक महिने थकीत आहेत. यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारने त्यांची थकीत देयके तातडीने द्यावीत, नाहीतर त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येईल. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हर्षल पाटील यांची आत्महत्या त्याच इशाऱ्याला दुजोरा देत असल्याचं स्पष्ट होतं आहे.
Jayant Patil हर्षल पाटील यांची आत्महत्या
हर्षल पाटील हे सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील रहिवासी. त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे कंत्राट घेतले होते. अनेक महिने हे काम पूर्ण होऊन उलटले तरी शासनाकडून त्यांना सुमारे 1.40 कोटींची देयके मिळाली नाहीत. त्यातच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी खासगी सावकार अन् इतर स्रोतांकडून 65 लाखांचे कर्ज घेतले होते. थकीत बिले, देणेकऱ्यांचा सततचा तगादा आणि कोणतीही सरकारी मदत न मिळाल्यामुळे हर्षल यांनी मंगळवारी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.
Jayant Patil कंत्राटदार संघटनेचे गंभीर आरोप
राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद जाधव यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राज्यभरातील शेकडो कंत्राटदार शासनाच्या असंवेदनशीलतेमुळे आर्थिक संकटात आहेत. थकीत देयकांच्या प्रश्नाकडे सरकार वारंवार दुर्लक्ष करत आहे. हर्षल पाटील हे त्याचं बळी ठरले आहेत. या घटनेमुळे सरकारवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जयंतराव पाटील यांचा इशारा जर सरकारने ऐकला असता, तर हर्षल पाटील वाचले असते का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.