22.2 C
New York

Ajit Pawar : सूरज चव्हाण… तात्काळ राजीनामा द्या, लातूर प्रकरणानंतर अजित पवारांच्या सूचना

Published:

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या युवक प्रदेशाध्यक्षाने छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. सूरज चव्हाण (Suraj Chavan) रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला, त्यामुळे म्हणून आक्रमक झाले होते. लातूरमध्ये ही घटना घडली होती. त्यानंतर राज्यात मोठं तणावाचं वातावरण होतं. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे.

Ajit Pawar पदाचा त्वरित राजीनामा

अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह काल लातूरमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना मी त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

Ajit Pawar घटना अत्यंत गंभीर

काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला कोणत्याही प्रकारच्या मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो, असं अजित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट करत म्हटलं आहे.

Ajit Pawar राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता व बंधुत्वाच्या विचारांवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही उभी आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मुल्यांना प्राधान्य द्या, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img