भाजपकडून नुकतच रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं आहे. त्यांचा कार्यकाळ सुरू होताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आहेत. हिंदी सक्तीच्या विरोधावरून राज आणि उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लागावला आहे.
Ravindra Chavan काय म्हणाले रविंद्र चव्हाण?
याेवेळी बोलताना रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) म्हणलाे की, गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदी सक्तीची चर्चा होत होती. मग त्यावर त्यावेळीच का चर्चा नाही केली? हिंदी सक्ती करूच नये असं का म्हटले नाही? मात्र यावर अभ्यासकांनी अभ्यास करून त्यांचं मत मांडलं की, हिंदी सक्ती का गरजेची आहे? त्यांनतर प्रत्येक राज्याला त्यांचं मत विचारलं गेलं. त्यावेळी महाराष्ट्राला देखील विचारलं गेलं.
तसेच देवेंद्र फडणवीसांचं सरकार नेहमीच मराठी भाषेला प्राधान्य देत आलेलं आहे. देवेंद्र फडणवीस मु्ख्यमंत्री आणि विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना त्यांनीच राज्यामध्ये सर्व प्रकारचे अभ्यासक्रम हे मराठी या मातृभाषेमध्ये हवे. असा आग्रह धरला आणि त्याची सुरूवात देखील केली. कारण चीन वैगेरे इतर देशांमध्ये देखील लहान मुलांना सर्व प्रकारचं शिक्षण हे मातृभाषेतच दिलं जात. तसेच शास्त्रज्ञ देखील तेच सांगतात की, मातृभाषेतून दिलेलं शिक्षण हे जास्त फायदेशीर ठरतं.
मात्र आता निवडणुकांच्या तोंडांवर राज आणि उद्धव ठाकरेंनी हिंदीच्या मुद्द्याला केलेला विरोध हा केवळ राजकीय आहे. तसेच मराठीतून इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाची सुरूवात करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं ठाकरेंनी कधी अभिनंदन का नाही केलं? तसेच नुकतच तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा जीआर लोकांचा आग्रह आहे म्हणून रद्द करण्यात आला. मात्र त्यावर पुन्हा अभ्यासगट नियुक्त केला आहे. जर त्यांनी पुन्हा तसाच अहवाल दिला तर ठाकरे काय म्हणणार?